रुग्ण हक्क परिषदेचे आर एच पी हॉस्पिटल कोंढव्यात निर्माण झाले हे आमचे भाग्य – नगरसेवक हाजी गफूर पठाण

    55

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

    कोंढवा,पुणे(दि.23जून):-रुग्ण हक्क परिषदेने रुग्णांच्या हिताचे महान सेवाकार्य आज पर्यंत मनोभावे सुरू ठेवले आहे. आदर्श हॉस्पिटल कसे असावे? रुग्णांचे बिल भरतांना होणारा मनस्ताप आणि लूट झाल्याची भावना उमेश चव्हाण यांनी निर्माण केलेल्या रुग्णहक्क परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये नसेल याची आम्हा सर्वांना खात्री आहे. रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल म्हणून तयार झालेल्या या आर एस पी हॉस्पिटलचे आणि उमेश चव्हाण यांचे कोंढव्यात स्वागतच आहे. आर एच पी हॉस्पिटल कोंढव्यात होणे हे आम्हा सर्वांचे भाग्य आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोंढवा येथील नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी व्यक्त केले.
    रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या पुढाकाराने कोंढवा येथे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे या हॉस्पिटलचे उद्घाटन जागतिक डॉक्टर दिन म्हणजेच १ जुलै २०२१ रोजी होणार आहे.

    हॉस्पिटलच्या उद्घाटनापूर्वी कोंढवा परिसरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या पाहणीसाठी ‘आरएचपी हॉस्पिटल’ खुले करण्यात आले होते त्याप्रसंगी नगरसेवक हाजी गफूर पठाण, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, शिवसेनेचे नेते राजेंद्र बाबर, माऊली भोईटे, उद्योजक मोहसीन खान, सलीम कुरेशी, डॉ. सलीम आळतेकर, गिरीश घाग यांच्यासह कोंढवा परिसरातील असंख्य सामाजिक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

    राजेंद्र बाबर म्हणाले की, कोंढवा येथे सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एक दिलाने काम करीत असून येथे गरीब आणि श्रमिकांची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. आर एच पी हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेमुळे कोंढवा येथील नागरिकांना याचा निश्चितपणे फायदा होईल.या बैठकीचे आयोजन रुग्ण हक्क परिषदेचे ज्येष्ठ नेते अल्ताफ भाई तारकश यांनी केले. रुग्ण हक्क परिषद चे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी स्वागत तर गणेश भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. चांदभाई बळबट्टी यांनी आभार मानले.