भूकीचे अर्थशास्त्र

31

“माझ्या या प्रबंधाचा उद्देश हा आहे की,भारतीय चलन व्यवस्था कशाप्रकारे भक्कम पायावर उभी राहिल यांचे विवेचन करणे.मी जे लिहले आहे ते मुलतः भारतीय गरीब जनतेच्या भल्याचा विचार करूनच लिहले आहे.गरीब जनतेला चलन व्यवस्थेच्या सर्वसाधारण नियमांची कसलीही जाण नाही वा माहिती नाही.या विचारानेच मी या प्रबंधाचे लिखान केले आहे.”

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(प्रॉब्लेम ऑफ दि रूपी ग्रंथाची प्रस्तावना)
आजच्या कोरोनाच्या महामारीत नवनवे स्थितंतरे घडून येत आहेत.अनेक नव्या सिध्दांताची भर पडत आहे.विज्ञानाची नवी शाखा निर्माण होत आहे.नको तेवढे संशोधन जगात अव्याहातपणे सूरू आहेत.पृथ्वीवरील माणूस वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत.अशा अग्नीकल्लोळाच्या काळातही काही विकृत माणसे गरीब लोकांचे शोषण करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था भांडवलदारांनी काबीज केली आहे.स्विस बँकेत श्रीमंत लोकांच्या ठेवीचे प्रमाण वाढले आहे.देशातील नागरिकांना आर्थिक संकटात टाकून स्वःहीत जपणे हाच खेळ खेळला जात आहे.गरीब लोकांच्या शोषणावर अतोनात नफा कमवून देशाला लुटणारे हे छूपे नफेखाेर खरे देशद्रोही आहेत. भारतात नवी आर्थिक विषमता निर्माण करून भारतीय अर्थव्यवस्थेला काळोखाच्या गर्भात ढकलले जात आहे.देशाचे कर्णधार व वित्तमंत्री फक्त शब्दांची वाफ सोडून गरीब जनतेला फसवत आहेत.

कोरोनाच्या काळातील अनियाेजनामुळे भारतीय लोकांच्या भूकेचे अर्थशास्त्र मांडायला वेळ नाही.सरकार फक्त आपल्या पाहुण्यांना व मित्रांना गडगंज संपत्ती वाढविण्यास हातभार लावत आहे.अख्खा देश भूकेने व्याकूळ होत असतांना प्रधानसेवक स्वतःची इमेज वाचवण्यासाठी अनेक इव्हेंट घडवून आणत आहे.शोषित व गरीब यांचे सैंवधानिक अधिकार डावलून त्यांना शिक्षण व अर्थ यापासून कमकुवत करून नवी शोषणयुक्त व्यवस्था तयार करत आहेत.नुकताच जागतिक भूक निर्देशांक २०२० चा अहवाल आला आहे.यात १०७ देशाच्या यादीत भारत ९४ व्या स्थानावर आहे.रिपोर्टनुसार २७.२ गुणांसह भूकबळीची पातळी गंभीर आहे.यावरून तरी सरकार जाग यायला हवी पण ते येण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही.

माणसाची भूक ही नैसर्गिक गरज आहे.भूकेच्या शाेधातूनच त्यांनी परिवर्तनाची मजल मारली आहे . स्वतःला क्लेश देऊन जीवनाला उन्नत केले आहे.भूक हे भूमीचे काव्यच आहे.झिरपणाऱ्या पावसाच्या आल्हादायक फवाऱ्यातून नवे अंकूर जमीनीत उगवतात .हे अंकूर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उगवतात .पण यांचा फायदा फक्त भांडवलदारांना होतो आहे.
सरकारने कायद्याची बाजू सोडल्यामूळे करोडो कुटूंब भूकेने तळफळत आहेत.नियमाच्या धोरणाने अनेक लोकांना अनाज मिळत नाही.धान्य मिळालं तर तेल मिळत नाही.गँस मिळत नाही.ही अवस्था ज्या व्यवस्थेने आणली त्यांनीच सोडवायला हवी .नाहीतर हीच अदृश्य जनहीत शक्ती सरकारला चंद्रतारे दाखवल्याशिवाय राहणार नाही.

देशाचा विकास करायचा असेल तर सर्व नागरिकांचे पोट भरेल एवढे अन्न मिळायला हवे.उपासमारीने एकही माणूस मरणार नाही यांची काळजी शासनाने घ्यावी.गरीबावर ही परिस्थिती सरकारने आणली म्हणून त्यांनीच ते सोडवायला हवी.भटके विमुक्त ,आदिवासी,शोषित,पिडीत,कामगार,शेतकरी,छोटे दुकानदार,कचरा गोळा करणारे माणसे,केसावर भांडी विकणारी माणसे.चौकात वस्तू विकणारी माणसे इत्यादीचे जीवन भूकेने व्याकूळ होत आहेत.आपल व आपल्या मुलाचं भविष्य कसं होईल याच विचारचक्रात ते हरवून जात आहेत.

भूकीचे खरे अर्थशास्त्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते.देशात सर्व गरीब जनतेच्या हिताचे नवीन सिध्दांत त्यांनी मांडले पण भारतीय राज्यव्यवस्थेने त्यांचे सिध्दांत स्वि़कारले नाही.आज देशाची अर्थव्यवस्था दोलनामय स्थितीत अधातरी असतांना बाबासाहेबांच्या अर्थनीतीचा उपयोग वर्तमान शासन करत नाही.अमर्थ सेन यांनी सुध्दा नवे आर्थिक सिध्दांत मांडले आहेत.ते म्हणतात की,”साठेबाजीमुळे सामान्य माणसांना वस्तू खरेदी करता येत नाही.त्यामुळे उपासमारीचे जीवन जगावे लागते.यातूनच अनेक समस्या निर्माण होतात.”ते इक्वाँलिटी ऑफ व्हॉट मध्ये लिहितात की,”लोकांच्या क्षमता वाढवायच्या असतील तर त्याचे हक्क अबादित राहिले पाहिजे.आणि ते बजावण्याचे स्वातंत्र्य व योग्य त्या सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजे. उदा.लोकांना मतदानाचा निव्वळ हक्क देऊन उपयोग नाही त्यांना तो बजावण्याचे योग्य व चांगले शिक्षण मिळायला पाहिजे.”हे वास्तव वर्तमान सरकारने समजून घ्यायला हवे.अमर्थ सेन डॉ.बाबासाहेबाच्या कार्याविषयी म्हणतात की,”आंबेडकर अर्थशास्त्र के क्षेत्र में मेरे जनक है। दलितो -शोषितों के सच्चे और जाने माने महानायक है।उन्हे आजतक जो भी मान-सम्मान मीले है वे उसके कही ज्यादा के अधिकारी है।भारत मे वे अत्यधिक विवादित है।हालांकी उनके जीवन और व्यक्तित्व में विवाद योग्य कुछ भी नही है।जो उनकी आलोचना में कहा जाता है वह वास्तविकता के एकदम परे है।अर्थशास्त्र के क्षेत्र में उसका योगदान बहोत बड़ा है।”हे विचार आंबेडकरांच्या कार्यकर्तुत्वाच्या सीमा रेखांखित करणारे आहेत.

भूकीचे अर्थशास्त्र नव्या स्वरूपात मांडणे काळाची गरज आहे.पृथ्वीवर सर्व मानवाला जगण्याचा नैसर्गिक अधिकार आहे .त्याचे मुलभूत अधिकार देणे ही शासनाची जबाबदारी आहे.ते यामधून पळवाटा काढू शकत नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,”हम कह सकते है की समस्या संपत्ती मे नही बल्की उसके असमान वितरण मे है।”ही सत्यजाणीव सरकारला लवकरात लवकर व्हावी हीच मनिच्छा.

आजच्या या भयावह काळात अनेक कुटूंब उद्धवस्त झाले आहेत.रोजगाराचे स्त्राेत नसल्याने ते अधिक गरीब झाले आहेत .जवळपास ४० टक्के लोक दारिद्र रेषेखाली गेले आहेत.करोडो लोकांचे जीवन अंधकारमय झाले आहेत.फिरस्ती करणारा समाज,उड्डाणपूलाखाली आपले जीवन घालवत आहे.भूक कशी भागवावी यांने तो बैचेन आहे.आलेला दिवस ढकलत जाणे एवढच त्याला ठाऊक आहे.पाणी पिऊन भूक भागवने हाच एकमेव उपाय त्याला माहित आहे. भूक ही भाकरीच्या शोधात सातत्याने धावत असते.उत्तम कांबळे आपल्या “भाकरी” या कवितेत लिहितात की,

भाकरी युगाची शाप असते इतिहास असते आणि भूगोलही
गळ्यातला फास आणि श्वासही
कोड भरलेलं आकाश आणि भासही
भाकरी
साक्षिदार असते धर्मयुध्दांची नि कर्मयुध्दाची
कागदावर अलगद येणाऱ्या कवितांची
अन् कविता पेरलेल्या स्फोटकांची

ही कविता भूकीचे वास्तव व्यक्त करते.
बिनचेहऱ्यांची ही माणसे स्वातंत्र्य देशात स्वतःच अस्तित्व शोधत आहेत.अन्नासाठी वावरोवारी , गल्लोगल्ली,सडकोसडकी फिरत आहे.नागपूरच्या हायवेवर प्रेमिकांची गर्दी वाढली आहे.गरीब मात्र पोटाच्या खळगीसाठी भटकत आहे.भूकीचे अर्थशास्त्र नव्याने मांडावे लागणार आहे.केंद्रिकरण झालेल्या अर्थव्यवस्थेचे विकेंद्रकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.नाहीतर दोन टक्केवाले लोक भारताच्या लोकांना उपासमारीनेच मारून टाकतील .आता आपण ठरवायच आहे.उपासमारीने मरायच की लढून मरायचं.शेवटी निर्णय आपलाच आहे.तूर्ताश खांबतो….!

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००