गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळाचा वर्धापन दिन संपन्न

36

🔸मंडळातर्फे सात साहित्य सेवकांचा विशेष गौरव

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23जून):- झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने चवथा वर्धापनदिन परीश्रम भवनात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव विलास निंबोरकर होते . ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ कवयित्री कुसुमताई अलाम, मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ.चंद्रकांत लेनगुरे,उपाध्यक्ष प्रा.विनायक धानोरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ.लेनगुरे यांनी प्रास्ताविकेतून शाखेच्या आजवरच्या कार्याचा आलेख सादर केला.

याप्रसंगी विलास निंबोरकर यांनी मंडळातर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख करत बोली चळवळीचे अभिनंदन केले तर श्रीमती अलाम यांनी मौशिखांब येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात प्रकाश टाकला. ग्रामगीताचार्य बोढेकर यांनी झाडीबोली चळवळीचा इतिहास आणि बोलीचे महत्व याबाबत मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मंडळाच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन ज्या साहित्यिकांनी मागील वर्षी पुस्तके प्रकाशित केलेले आहे.

असे बंडोपंत बोढेकर, डॉ.चंद्रकांत लेनगुरे,मारोती आरेवार, भोजराज कानेकर,प्रमोद बोरसरे, जितेंद्र रायपुरे,मालती सेमले या साहित्यिकांचा शाखेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष योगदानाबद्दल ग्राफिक्सकार संजिव बोरकर यांना सन्मानित करण्यात आले.वर्धापनदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कविसंमेलनात वर्षा पडघम,पुरूषोत्तम ठाकरे,प्रमोद राऊत,उपेंद्र रोहणकर आदींनी काव्यवाचन करून रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कमलेश झाडे यांनी केले .परिश्रम भवनात छोट्या स्वरूपात झाडीबोली ग्रंथ संकलन कक्ष सुरू करण्यात आले.