ना. देसाईंचा महाचोर विकासक विमल शहाला वरद (?) जनता झाली गारद

35

🔸उद्योगमंत्री साहेब पुनर्वसन प्रकल्पाकडे लक्ष द्या.:- डॉ. राजन माकणीकर

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.24जून):-आकृती हब टाऊन विकासक विमल शहा ला उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या वरद आहे की काय? मूळ झोपडीधारक गारद झाला असताना, विकासकांची मुजोरी वाढत आहे अन मंत्री महोदय चुप्प का आहेत. असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसार माध्यमांना विचारला आहे.*

१५ ते २० वर्षा आधी आकृती हब टाऊन विकासकाने परिशिष्ट बनवून एमआयडीसी ने पात्र ठरवून झोपडी धारकांना सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे.

मात्र; आकृती/हबटाऊन विकासकाने मंजूर परिशिष्ट-२ मधील १३३ पात्र झोपडीधारकांच्या पात्रतेवर आक्षेप घेतल्या मूळे पात्र झोपडी धारकांच्या पात्रतेचे पुनरावलोकन होण्याची नोटीस नुकतीच बजावण्यात आली आहे. हे कृत्य निंदनीय आहे.

विकासक विमल शहाच्या सांगण्याहून उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी प्रशासनाला पुनरावलोकनाचे तोंडी आदेश दिले आहेत, आहेत आणि कोणी आमचे बिघडवू शकत नाहीत अशा अफवांचे पेव विकासकाचे दलाल पसरवत आहेत, यामुळे एमआयडीसी प्रशासनासह ना. उद्योग मंत्री महोदयांची प्रतिमा मालिन करण्याचे निंदणीय काम ही लोक करत आहेत. अश्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीररीत्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचेही पँथर डॉ. माकणीकर म्हणाले.

वंचित पीडित मूळ झोपडीधारकांना न्याय मिळवून, महाचोर, महादलालांवर कायदेशीर कार्यवाही होण्यासाठी या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्री महोदयांची लवकरच पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात, कॅप्टन श्रावण गायकवाड, हरिभाऊ कांबळे, भाई विजय चव्हाण, शिवा राठोड, राजेश पिल्ले आदींचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी सांगितले.

शासनाच्या प्रकल्पात महाचोर विकासक चोरी करत असून एमआयडीसी चे काही तत्कालीन भ्रष्ट अधिकारी यात गुंतले आहेत, मा. मंत्री महोदयांनी गांभीर्याने लक्ष देऊन चौकशीचे आदेश दिले तर योग्य न्यायदान होईल अशी अपेक्षा डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली.