पोलीस प्रशासनाच्या दादागिरी मुळे जनता त्रस्त लवकरच रस्त्यावर उतरणार- संतोष जोगदंडे(तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,उमरखेड)

  147

  ✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका,प्रतिनिधी उमरखेड)

  उमरखेड(दि.24जून):-कोरोणाच्या कळात सर्व व्यवसाय उद्धोग-धंदे रोजगाराचे सर्व मार्ग बंद असतांना प्रत्येक जण घर चालवण्यासाठीच संघर्ष करत आहे.त्यात महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. किरकोळ आजारात वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे अनेक जणांना म्रुत्यु झाले, घरातील करतेहरते गेल्यामुळे पत्नी मुलाबाळाची काय? अवस्ता असेल हा कल्पनेपलीकडचा विषय आहे. खाजगी व परिवहन यंत्रणा बंद असल्याने प्रतेकाला दुचाकिचाच वापर करणे भाग पडत आहे, ज्याच्याकडे दुचाकी नाही आश्यांनी कुणाची तरी दुचाकी घेऊन प्रवास केला.

  आज सर्व खुले झाले तरी खाजगी वाहन दुप्पट ते तिप्पट भाडे घेऊन प्रवाशांची अक्षरशः लुट करत आहे, खाजगी वाहनांना मात्र आर्थिक तडजोड (हप्तेबांधीमुळे) पोलिसांनी सुट दिलेली आहे.
  बुधवार उमरखेड चा आठवडी बाजार, आठवडी बाजाराच्या दिवशी खाजगी वाहनधारकांकडून पोलीसांकडुन हप्ते वसुली मोठ्या प्रमाणात केल्या जाते. ढाणकी आठवडी बाजार, मुळावा आठवडी बाजार, प्रत्येक आठवडी बाजाराच्या दिवशी त्या..त्या भागातल्या वाहनधाकाकडुन मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली केली जाते.आम्ही पोलिसांना हप्ते देतो तर जनता आमचे काय? करणार या तोर्यात टीकीट दरावरून सभ्य माणसाला सुद्धा वाहनधाकाकडुन हुज्जत गीरी, दमदाटी करून अपमाणीत केल्या जाते.

  जेमतेम पैसे घेऊन महत्त्वाच्या कामाला जाणाऱ्या दुचाकी स्वाराला ठिकठिकाणी अडउन लायसन्स च्या नावाखाली व ईतर कारणास्तव अडऊन 100,200-500 रुपयांची मागणी केली जाते, पैसे न दिल्यास केसेस ची धमकी दिली जाते, भितीपोटी नाविलाजाने पैसे द्यावे लागतात. दुसरीकडे मात्र वरळी मटका,जुगार, गावठी दारू, देशी दारु,मोठ्या प्रमाणात चालू आहे.

  महसुली मालमत्ता दगड ,माती,मुरूम, रेतीची अवैध तस्करी महसूल पासून पोलीस यंत्रणेला हप्ते देऊन भयंकर प्रमाणात चालू आहे, यामध्ये सत्ता धार्यासह वरिष्ठांना मलीदा दिल्या जातो, हे कुठेतरी थांबले पाहिजे. सामान्य माणसाला हा नाहक त्रास किती दिवस सहन होणार..? पोलीस प्रशासनावर कुणाचाच धाक राहीलेला नाही..!या मोकाट यंत्रणेला आळा घालण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडी उमरखेड च्या वतीने तिव्र स्वरूपात विरोध करुन रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.अशी माहीत आमच्या प्रतिनिधीशी दिली गेली आहे.