आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

26

✒️भडगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भडगांव(दि.24जून):- दि. २४ जुन, २०२१ गुरुवार रोजी आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.महाविद्यालयातील महिला शिक्षकांनी वटपौर्णिमेला पारंपारिक प्रथेला फाटा देत वृक्षांची पूजा न करता वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. कोरोना महामारी मध्ये अनेक लोकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला म्हणून सर्वांनी मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला.या स्थुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आण्णासो. एकनाथ गरबड महाजन व मानद सचिव आण्णासो. दिपक संभाजी महाजन व संचालक मंडळ यांनी कौतुक केले.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली.आर.ए.पाटील, वाय.ए.पाटील, एस.ई. महाजन, एस.व्ही.मोरे, दीपमाला पाटील ,मनीषा महाजन या महिला शिक्षकांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.रोकडे, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधु -भगिनी शिक्षेकतर कर्मचारी वृंद व सुधाकर भाऊ उपस्थित होते.