✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.24जून):- ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथे आज एक नवजात बालीका सापडली असून जिवंत असल्याने त्यास तात्काळ ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटना मेंडकी बस स्टॉप पासून माळी मोहल्या मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर खाली प्लाट मध्ये एका कापडा मध्ये गुंडाळून ठेवले होते. सकाळी ५ वाजता सुमारास शौचालयाला जाणाऱ्या महिलांना दिसताच मेंडकी पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल होवुन नवजात बालीकास उपचारासाठी ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अंधाराचा फायदा घेऊन नवजात अर्भक कचऱ्यात फेकल्या गेला असावा असा अंदाज व्यक केल्या जात आहे. हि नवजात बालिका प्रेम प्रकरनातून जन्मास आलि असावि असा अंदाज दर्शविन्यात येत आहे. पुढिल तपास मेंडकी पोलिस करीत आहेत.

महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED