भांब येथे कोविड लसीकरण शिबिरास सुरुवात

34

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

महागाव(दि.24जून):-तालुक्यातील भांब येथे सरपंच, उपसरपंच, सचिव, ग्रा.पं.सदस्य यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत कार्यालय येथे दि.२४ जुन रोजी कोविड -१९ प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर घेण्यात आले.

आरोग्य केंद्र आमणी (बु) येथे कोविड- १९ प्रतिबंधात्मक लस मिळते .परंतु गावापासून आरोग्य केंद्रांचे अंतर दूर असल्यामुळे व आरोग्य केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक लस भांब येथे १८ वर्षावरील २३० नागरिकांना लस देण्यात आली.

यावेळी लसीकरणासाठी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शेख शब्बीर ,आरोग्यसेविका सौ. अर्चना यलुतवाढ,आरोग्य सहाय्यक थोरात साहेब,सरपंच सौ.आशाताई कांबळे, उपसरपंच , पो.पा.सौ.वंदनाताई हाडोळे,तलाठी रायपूरकर,ग्रा.पं. सदस्य आणि ग्रा.पं.कर्मचारी माणिक मोहटे, आशासेविका शिला खंदारे, सुलोचना राठोड, दिक्षाताई भालेराव,कोविड स्टाफ सिस्टर प्रतिक्षा,डाटा ऑपरेटर सोनु सय्यद, ॲम्बुलन्स ड्रायव्हर अशिरभाई,ईत्यादी उपस्थित होते.

या लसीकरण शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नखाते यांनी मार्गदर्शन केले.सरपंच आशाताई कांबळे यांनी कोविड स्टाफ व लसीकरण घेतलेल्या नागरिकांचे आभार मानले.