घरकुलाचे प्रलंबित हप्ते वाटप करण्याची मागणी

24

🔸एम आय एम ची मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24जून):- शहरातील घरकुल लाभधारकांचे प्रलंबित लवकर वाटप करा अशी मागणी निवेदनाव्दारे गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी परभणी यांना एम आय एम च्या वतीने केली आहे.दि २३ जून रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गंगाखेड शहरातील घरकुल लाभार्थी हे बांधकाम करण्यासाठी आपले घर रिकामे करून किरायाने राहतात,कोरोना महामारी ने परेशान झाले आहेत. लाभधारकांच्या कुटुबीयांची हेळसांड होत आहे, सर्व लाभार्थी हे गोरगरीब असल्याने कुटुंबातील सदस्य चा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले आहे.

पावसाळा सुरू झाल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे, घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते मिळाले तर बांधकाम करून राहण्याची व्यवस्था होईल व आर्थिक कुचंबणा थांबेन, तसेच काही लाभार्थी हे व्याजाने पैसे काढून किराया देत आहेत. तरी लाभार्थी यांचे तात्काळ वाटप केले नाही तर एम आय एम च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनाव्दारे दिला आहे. या निवेदनावर एम आय एम चे विधानसभा अध्यक्ष स रुस्तुम स शरीफ, शहराध्यक्ष अमजत पठाण, युवा शहराध्यक्ष, निहाल पठाण,सावेर खान,फेरोज शेख,स्वप्नील पैठणे,खिजर सय्यद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.