एस.टी.आगारातील वाहन परीक्षक चतुर्भुज लाचलुचपत शाखेच्या जाळ्यात

25

🔺5 हजार रुपये स्वीकारणे पडले महाग

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रातिनीधी)

गंगाखेड(दि.24जून):-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गंगाखेड आगारातील आगार प्रमुख किशन कराळे व वाहन परीक्षक सुर्यकांत पांडुरंग दहीफळे यांनी आजारी असलेले तक्रारदार वाहन चालकास डिझेल पंपावर ड्युटी लावण्यासाठी लाचेची मागणी केली असता वाहन परीक्षक सूर्यकांत दहिफळे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना २४जून रोजी चतुर्भुज करण्यात आले.
तक्रारदार हे राज्य परिवहन महामंडळ गंगाखेड डेपो येथे वाहन चालक आहेत. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर दीड वर्षाने कर्तव्यावर रुजू झाले. त्यावेळेस त्यांनी आगार प्रमुख किशन कराळे यांना धावपळीची ड्युटी न लावण्याची विनंती केली.

असता त्यांनी तक्रारदार यांना पैशाची मागणी केली व वाहन परीक्षक सूर्यकांत दहिफळे यांना भेटण्यास सांगितल्या नंतर वाहन परीक्षक सुर्यकांत दहिफळ यांनी बारा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता पाच हजार रुपये पंचा समक्ष स्वीकारले. त्यामुळे गंगाखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील कार्यवाही नांदेड परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलीस कर्मचारी हनुमंते, कटारे, घट्टे, धबडगे, मुखीद, कुलकर्णी, दंडवते, ढेरे, कदम, यांनी यशस्वी केली.