ओबीसी आरक्षण रद्द करणाऱ्या मोदी सरकारविरोधात 26 जून रोजी आंदोलन

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.25जून):- मोदी सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसींचे आरक्षण कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षण रक्षणासाठी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जून राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौक येथे सकाळी १० वाजता आंदोलन केले जाणार आहे.ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यामागे राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली. मात्र, केंद्र सरकारने ती दिली नाही.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा घाट आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीने संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन मोदी सरकारचा निषेध नोंदवावा, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.