शिंदे गावातील मंडलाधिकारी यास दहा हजार रुपयाची लाच घेताना अटक

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.25जून):- शिंदे गावातील मंडळ अधिकारी प्रशांत भास्कर घोडके यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात ते बिटको महाविद्यालयाच्या पोलीस चौकी समोर लाच घेताना सापडले मौजे चाकूर येथील गट क्रमांक 542 /2 येथे जमिनीचा केलेला इ टी एस मोजणीच्या प्रतीसाठी व तक्रारदार विरुद्ध होणाऱ्या दंडात्मक कारवाई त्यांना मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी घोडके यांनी केली.

त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानंतर सदर तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला या सापळ्यात मंडळाधिकारी सापडले या प्रकरणी उपनगर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 सुधारित कलम सात प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे