कृषी संजिवनी मोहीम अंतर्गत सोयाबीन रूंद वरंबा सरी (बी .बी. एफ.) यंत्रा द्वारे पेरणी

30

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड(दि.26जून):- दि 25 जून रोजी कृषी संजिवनी मोहीम अंतर्गतदिनांक 21 जून ते 1 जुलै या कालावधीत उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग आत्मा यांच्या वतीने कृषी संजीवनी मोहिमे मध्ये सोयाबीन रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ) यंत्रा द्वारे पेरणी मौजे मार्लेगाव येथील शेतकरी कृष्णा सूर्यवंशी व वरुड बीबी येथील शेतकरी श्री. दीपक गंगात्रे ,श्री.विकास मुटकुळे यांचे शेतावर करण्यात आली.

कृषी विभागाच्या pocra योजनेतील डॉ. श्री.प्रशांत नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी, पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या कृषी औजारे बँके मार्फत स्टार फार्मर प्रोड्युसर कंपनी ली.मार्लेगाव यांच्या बी. बी .एफ .यंत्रा द्वारे पेरणी करणात आली.या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी,श्री. श्रीरंग लिंबालकर यांनी सोयाबीन बी. बी. एफ .पद्धतीने पेरणी करणे व त्याचे फायदे आणि महत्त्व सांगितले तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री.सुनील देशपांडे यांनी जमीन आरोग्य पत्रिके नुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर या बाबत माहिती सांगितली तसेच आत्मा बी.टी. एम .श्री.रत्नदीप धुळे यांनी बीज प्रक्रिया (एफ.आय.आर) या क्रमाने व कशी करावी या बाबत माहिती सांगितली .या प्रसंगीं कृषी पर्यवेक्षक श्री. हामद, श्री.चव्हाण ,कृषी सहाय्यक श्री.बिरमवार ,स्टार फार्मर प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष व सचिव श्री .शिवाजी शिंदे ,कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते.