गंगाखेड येथे चक्काजाम आंदोलन

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26जून):- येथे ओबीसी चे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले असून या तिघाडी सरकारच्या विरोधात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे भाजपा राष्ट्रीय सचिव यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आज महाराणा प्रताप चौक, परळी नाका गंगाखेड येथे चक्काजाम आंदोलन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी च्या सर्व कार्यकर्त्यांना गंगाखेड पोलीस स्टेशन येथे अटक करून त्यांना थोड्यावेळाने सोडण्यात आले.

गंगाखेड येथील हे आंदोलन मा.रामप्रभु जी मुंडे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात  आले असून  यावेळी उपस्थित बाळासाहेब पारवे, कृष्णाजी सोळंके तालुकाध्यक्ष, मनोज मुंडे बोर्डा सरपंच, प्रशांत फड, लक्ष्मीकांत जब्दे, राम फड, जगन्नाथ आंधळे, मोहन गित्ते सर, हिरा मेहता, श्रीनिवास मोटे, मनोज मुरकुटे, देवानंद जोशी, गोविंद रोडे, राम कुलकर्णी, भास्कर जाधव, लक्ष्मीकांत जब्दे, अभय चव्हाण, शैलेश पालटवाड, शिवाजी शिंदे, रामेश्वर आळनुरे, गणेश चव्हाण, रवी लांब, ओमकेश आंधळे, देवानंद जोशी, संतोष मुंडे, अक्षय केंद्रे, सूर्यभान राठोड, केशव राठोड ,दिलीप चव्हाण, ज्योतीराम चव्हाण, नामदेव चव्हाण, संतोष चव्हाण, सोपान ईमडे व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.