पिंपळदरी ग्रामस्थांच्यावतीने भरत घनदाट यांचा नागरी सत्कार संपन्न

    57

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.28जून):-विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामासाठी आम्ही घनदाट कुटुंबीय तत्पर असून आम्हाला या मतदारसंघातील जनतेची व युवा पिढीची साथ असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस, जि प सदस्य भरत घनदाट यांनी पिंपळदरी ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना आपले मत व्यक्त केले.

    गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सीतारामजी घनदाट मामा यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पिंपळदरी ग्रामस्थांच्यावतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने दि.27/06/21 रविवार रोजी श्री संत मोतीराम महाराज मंदिर पिंपळदरी येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णुपंत मुंडे, सत्कार मूर्ती भरत घनदाट, दत्तराव भोसले, गणेश काळे, गौतम हत्तीअंबीरे, ब्रह्मानंद भोसले सरपंच प्रतिनिधी शुभम मुंडे, अनंतराव मुंडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

    पुढे बोलताना भरत घनदाट म्हणाले की गंगाखेड विधानसभेच्या सुजान जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आणि आम्हाला तीन वेळेस या मतदारसंघाचा प्रतिनिधी आमदार म्हणून विधानसभेत पाठवले. याचे आम्ही कधीही ऋण फेडू शकणार नाहीत. आता माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असाच विश्वास टाकून एक मोठी जबाबदारी देऊन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी माझी निवड केली हा पक्षाचा विश्वास व या मतदारसंघातील जनतेचा विश्वास मी कधीही ढळू देणार नाही. मी कोणत्याही पक्षातील व्यक्तीसोबत या मतदार संघाच्या विकास कामासाठी व जनतेच्या अडीअडचणी साठी सामोरे जाईल. यासाठी माझ्यासोबत युवा वर्गांची साथ असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

    यावेळी आयोजक मोतीराम आरसले, शुभम मुंडे, अनिल मुंडे, सुधाकर मुंडे भारत मुंडे, दीपक मुंडे, उद्धव चाटे यांनी ग्रामीण भागातील विकास कामासंदर्भात आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विष्णू घुले, सतीश महाराज मुंडे, पांडुरंग रुद्रे, संजय मुंडे, पांडुरंग तंबुड, माधव तंबुड, माधव आरसले, किशन अरसले, बंडू मुंडे, सुधाकर घुले आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उद्धव चाटे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल मुंडे यांनी केले त्या कार्यक्रमाचे आभार दीपक मुंडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पिंपळदरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.