कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत पिंपळदरी येथे शेतकरी कार्यशाळा

    51

    ✒️अमोल जोगदंडे(उमरखेड प्रतिनिधी)

    उमरखेड(दि.29जून):- उपविभागीय कृषी अधिकारी पुसद डॉ. प्रशांत नाईक व तालुका कृषी अधिकारी उमरखेड श्री. लिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळदरी येथे कृषी संजीवनी मोहीम २०२१ अंतर्गत शेतकऱ्यांची कार्यशाळा मंगळवार दिनांक २९ जून २०२१ रोजी घेण्यात आली .

    या कार्यशाळे करीता मा.श्री . प्रज्ञानंदजी खडसे , सभापती पंचायत समिती उमरखेड व मा.श्री .चिंतगराव कदम जिल्हा परीषद सदस्य उपस्थित होते.कार्यशाळे मध्ये मंडळ कृषी अधिकारी जी. एस. पेन्टेवाड यांनी कृषी संजीवनी मोहीम विषयी प्रास्ताविक मध्ये बी बी एफ वर सोयाबीन पेरणी चे महत्व , सुक्ष्म सिंचन योजना , रिसोर्स बँक तयार करणे तसेच पीक विमा विषयी माहिती व या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन शेतकर्यांना केले . कृषी पर्यवेक्षक आर. एन . शिंदे यांनी सोयाबीन व कापूस पिकावरील किड नियंत्रण म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करून पर्यावरण संतुलन राहीले पाहीजे याविषयी मार्गदर्शन केले.

    कृषी सहायक एस. एस. परतवाड यांनी गटशेती , कृषी यांत्रिकीकरण , खंताचा संतुलीत वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले.सभापती प्रज्ञानंद खडसे यांनी शेतकर्यानी जास्तीत जास्त कृषी योजनाचा लाभ घ्यावा तसेच पीक विमा विषयी प्रत्येक गावामध्ये पाऊस मोजणी यंत्र बसवावे याबाबत पाठपुरवा करण्याची मागणी केली . शेतपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहीजे याहष्टीने प्रयत्न झाले पाहीजे असे सांगितले . मा. चिंतगराव कदम सर यांनी शेतकर्यांनी आधुनिक यांत्रिक पद्धत वापरून कमी क्षेत्रावर जास्त उत्पन्न काढण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे , रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर , फळबाग लागवड , नाडेप कंपोस्ट खत या योजना राबविल्या पाहिजे असे सांगितले . भाजीपाला उत्पादक प्रगतशिल शेतकरी माणिकराम मिरासे यांचे मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला . त्यांनी भाजीपाला पिकाचे स्वतः चे बियाणे तयार करून वापर केला आहे.

    सदर कार्यशाळेस पिंपळदरी सरंपच श्री. बंडुभाऊ ढाकरे , पोलीस पाटील रंजनाताई रिट्ठे , माजी पं.स. सदस्य मारोतराव क-हाळे , ग्रामसेवक योगेश दुधे ,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष ढाले , माजी सरंपच हनवंते , सुरेश तांबारे , सोनबा गंधारे, रावजी कबले , संदेश कांबळे ( पत्रकार ) कृषी मित्र अमोल जोगदंडे , दत्ता माहुरे , कृषी सहायक विवेक मुसने व ग्रामपंचायत उपसरंपच ,सदस्य , शेतकरी उपस्थित होते. कार्यकमाचे सुत्रसंचालन पिंपळदरी चे कृषी सहायक सोमनाथ जाधव यांनी केले तर अभार परतवाड साहेब यांनी केले. तसेच कृषी विभागाच्या महा डीबीटी योजनांबाबत संपूर्ण माहिती दिली .