विठ्ठल नगर मधील त्या अर्धवट नाली बांधकामाचं काय – शिवानंद पांचाळ नायगावकर

    40

    ✒️नायगांव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नायगांव(दि.29जून):-बाजार २९ जुन ) नायगांव शहरात ठिकठिकाणी शहर स्वच्छ म्हणून फलक झळकत असले तरी तो एक बोजवाराच म्हणावे लागेल कारण शहरात घाणीचे साम्राज्य अनेक ठिक ठिकाणी दिसुन येते , शहरातील विठ्ठल नगर येथील नालीचे अर्थवट केलेले बांधकाम पुर्ण नाही झाल्यास अमरण उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी लेखी निवेदनाद्वारे नायगांव नगरपंचायतीच्या मुख्यधिकाऱ्याकडे केला.

    आसुन विकास कामातही राजकारण करण्याची घाणरड्डी सवय पदाधिकारी व आधिकारी यांना का असावी असा प्रश्न शहर वाशीयांना पडला आहे, शहरीतील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांच्या विठ्ठल नगर येथील घरापुढे नाली चे बांधकाम करण्यात आले परंतु ती अर्थवट का करण्यात आली हा प्रश्न पुढे येतो ,जिथे कुंटूब राहतात त्यांच्या घरापुढे नाली चे खोदकाम करून ते अर्ध्यावरच सोडून देणे, असे का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

    त्या खड्यात पावसामुळे ,घाणीचे पाणी त्यावर असंख्य मच्छरांचा उपद्रव्य त्यामुळे अनेक आजारांना पुढे तर जावेच लागेल पण पाणी साचलेल्या खड्ड्यात वृद्ध किंवा निष्पाप लहान लेकरे बाळे पडले तर पुढे काय याला प्रशासनच जबाबदार राहणार, म्हणून सदर नाली बांधकाम पूर्णत्वाकडे जावे व घराच्या किनाऱ्यावर आलेला सि.सि .अर्धवट रस्ताही पूर्ण करण्यात यावा अन्यथा आपण संबंधित कार्यालयापुढे आमरण उपोषण करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार व नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिला असून या उपोषणास युवा नेते गजानन पाटील चव्हाण यांचा व इतर कार्यकर्त्यांचा पाठिंबा राहणार आहे,