अॉनलाईन शिक्षणाची वेळ बदलवण्याबाबत शिक्षक भारतीचे शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन

24

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.29जून):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अॉनलाईन पद्धतीने शिक्षणाचे काम सुरु आहे.प्रत्य क्ष शाळा,कॉलेज भरत नसल्याने विद्यार्थी मोबाईल किंवा लॕपटाॕपच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत.ग्रामीण भागात बरेचसे पालक हे मोलमजूरी,शेतीची कामे करतात.त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत अॉनलाईन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध होत नाही.काही प्रमाणात शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे.त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी अॉनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत.त्यामुळे अॉनलाईन शिक्षणाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ करण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

तसेच गरीब,वंचित व कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या पालकांना इंटरनेट पॕक मारण्यासाठी प्रती विद्यार्थी रिचार्ज किंवा भत्ता देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा,या आशयाचे पत्र आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवले आहे,अशी माहिती शिक्षक भारती नागपूर विभाग सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे,जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख,सरचिटणीस नंदकिशोर शेरकी,संघटक विलास फलके,उपाध्यक्ष विरेनकुमार खोब्रागडे,राजेश धोंगडे,माध्यमिक विभागाचे भास्कर बावनकर,कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे,कार्यवाह राकेश पायताडे,प्रशांत सुरपाम,सतिश डांगे,प्रविण पिसे आदींनी दिली आहे.