बँकांनी पीककर्ज विनाविलंब कागदपत्रांची अडवणूक न करता वाटप करावे – भाई प्रवीण खोडसे

33

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.30जून):-सध्या खरीप पीककर्ज वाटप चालू आहे व राज्याच्या महसूल विभागाने आपल्या संकेतस्थळावर बँकाशी करार केला आहे. आता या बँकांतून डिजीटल स्वाक्षरीने सातबारा उतारा, आठ अ व फेरफार आँनलाईन पध्दतीने बँकेत उपलब्ध आहे. यात बीड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा समावेश करण्यात आला आहे.तरीही राष्ट्रीय बँकांकडून तलाठी स्वाक्षरी असलेला कागदपत्राची मागणी होत आहे.आहे.यामध्ये शेतकरी पूर्णतःभरडला जात आहे.काहींना फेरफारसाठी तहसीलला जावे लागते.

बँकांना दिलेल्या संकेतस्थळावरून कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांना कर्ज पूरवठा करावा याबाबत बँकांना सक्त सूचना करण्यात यावी यामुळे महसूल विभागालाही कामाचा ताण कमी होईल व शेतकर्यांचीही आर्थिक बचत होईल. व पीककर्ज विनाविलंब वाटप करावे .तरी आपण तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोरभाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा निवेदनाद्वारे शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाप्रमुख भाई प्रवीण खोडसे यांनी दिला आहे.