पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

20

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो-8080942185

केज(दि.30जून):-संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रविण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील शासकिय विश्रामगृहावर रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेड या वैचारिक संघटनेच्या केज तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.त्यात सामाजिक काम करून चळवळीत आपले योगदान देणाऱ्या शिवश्री कैलास चाळक यांच्या सामाजीक कार्याची दखल घेवून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रविण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवश्री कैलास चाळक यांची केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

याचबरोबर शिवश्री सचिन धनराज साखरे यांची तालुका कार्याध्यक्षपदी तर शिवश्री महावीर अर्जून पटेकर यांची तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे त्यानिमित्ताने पुरोगामी पत्रकार संघ केज शाखेच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय मुजमुले,तालुका सचिव रंजित घाडगे,कोषाध्यक्ष हनुमंत गव्हाणे,शेकाप चे तालुकाप्रमुख भाई प्रवीण खोडसे उपस्थित होते.