चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आपदग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीचे वितरण

23

🔹बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे व बँकेच्या संचालीका सौ.सुचित्राताई ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30जून):-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधीअंतर्गत ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव बुज येथील आपदग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे व बँकेच्या संचालीका सौ. सुचित्राताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव बुज येथील सुरेश रामटेके व अश्विनी मेश्राम यांचा ३ जुन २०२१ रोजी वीज पडुन मृत्यू झाला होता.

त्यानंतर सदर मृतकाच्या कुटुंबीयांनी शेतकरी कल्याण निधी अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.त्यानंतर चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने सदर प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्यात आली.सदर अर्थसहाय्याच्या धनादेशाचे वितरण प्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, बँकेच्या संचालीका सौ. सुचित्राताई ठाकरे, बँकेचे संचालक दामोधरजी मिसार, तोरगाव सहकारी संस्थचे अध्यक्ष शिवदास मेश्राम, सहकारी संस्थेचे सचिव अण्णाजी ठाकरे, बँकेचे विभागीय अधिकारी महेंद्र मातेरे, ब्रम्हपुरी शाखा व्यवस्थापक संजय वनवे हे यावेळी उपस्थित होते.