लसीकरण व कोविड वर पथनाट्य सादरीकरण सुरू

21

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.2जुलै):-ग्रामगीता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा च्या वतीने कोविड टिकाकरन व कोविड 19 रोग बाबत जन जागृती करीता पथनाट्य सादर करीत आहेत.सदर अभियानाची सुरुवात चिमूर शहरातून करण्यात आली.बस स्टँड,चावळी चौक,जुना बस स्टँड आदी ठिकाणी जण जागृतीपर पथ नाट्य सादर करण्यात आले.हे अभियान तालुक्यातील प्रत्येक गावी जाऊन लोककलेच्या मध्यमातून जण जनजागृती करणार आहे.

एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.बिजनकुमार शिल यांनी सांगितले की अभियान नाला चांगला प्रतिसाद मिळत असून लोक लोककलेतून वैज्ञानिक माहिती घेत आहेत.नाट्यपथकात सोनल तांबरभोगे,सचिन भरडे, साहिल मुनेश्वर, सौजन्य मोटघरे,निखिल मोडक, अभिषेक दांडेकर, कुलदीप पिंपलकर, आकाश श्रीरामे आदी विद्यार्थी सहभागी आहेत.प्राचार्य डॉ.अमीर धमानी यांच्या मार्गदर्शनात डॉ. मृणाल वऱ्हाडे,प्रा.ढोरे,प्रा.विवेक माणिक अभियानाची जबाबदारी सांभाळत आहेत.