शैक्षणिक परिषदा नियोजन कार्यवाहीबाबत शिक्षणमंत्र्यांना शिक्षक भारतीचे निवेदन

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.3जुलै):-सन २०२१ – २२ शैक्षणिक वर्षाच्या शैक्षणिक परिषदा नियोजन व कार्यवाही बाबत शिक्षण विभागाकडून जिल्हावार आदेश देण्यात येत आहेत.या वर्षात एकूण १० शिक्षण परिषदांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे.

मात्र कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सदर शैक्षणिक परिषदा ऑफलाइन घेण्यात येऊ नयेत अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही.त्यामुळे गर्दी करणे उचित होणार नाही.

सदर शैक्षणिक परिषदा किमान कोविड परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत तातडीने सर्व जिल्हा प्रशासनाला आदेश व्हावेत अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महाराष्ट्र राज्य यांना केली आहे,अशी माहिती शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, सरचिटणीस सुरेश डांगे,रविंद्र उरकुडे,जब्बार शेख,नंदकिशोर शेरकी,राजाराम घोडके,विरेनकुमार खोब्रागडे,विलास फलके,विजय मिटपल्लीवार,रंजना तडस,माधुरी डोंगरकर,निर्मला सोनवने,धनराज गेडाम,रावन शेरकुरे,विलास कोयचाडे,कैलास बोरकर,क्रिष्णा बावणे,राजेश धोंगडे,प्रेम पवार,शेषराव येरमे,किसन गेडाम,प्रभाकर कुळमेथे आदींनी दिली आहे.