बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता मेळाव्यास उत्तम प्रतिसाद

24

✒️श्रीरामपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

श्रीरामपुर(दि.3जुलै):- बहुजन समाज पार्टीच्या वतीने श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात नगरकर मंगल कार्यालय, श्रीरामपूर येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अ‍ॅड. अमोलिक सर यांनी केले. यावेळी त्यांनी महापुरुषांची महतीही सांगितली. श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष प्रकाश अहिरे यांनी महापुरुष काशिरामजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या विविध पैलूंचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पार्टीवाढीसाठी आपल्या भाषणांतून मत व्यक्त केले.

शिर्डी लोकसभा प्रभारी व श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष प्रकाश अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात अनेक नवीन कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांचा सत्कार करणात आला. नवीन कमिटी तयार करून एकनिष्ठ कार्यकर्त्यांना विविध पदे बहाल करण्यात आली. यामध्ये श्रीरामपूर तालुका सचिव पदी ताराचंद त्रिभुवन आणि सतीश परदेशी, श्रीरामपूर महिला शहराध्यक्ष पदी सुनंदाताई खरात तर श्रीरामपुर तालुका महिला शहर उपाध्यक्ष पदी कल्पनाताई त्रिभुवन, बेलापूर शाखा अध्यक्ष पदी बापु रामदास भगत, डावखर मळा शाखाध्यक्ष पदी सतीश मगर, संजय नगर शाखाध्यक्ष हारुण शहा, शहर सदस्य पदी सचिन साळवे, खैरी निमगाव शाखाध्यक्ष पदी कांताताई पटारे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

कार्यक्रमप्रसंगी तालुका प्रभारी बबन बोरगे, अरूण हिवराळे, तालुका सचिव राजु सरदार, माजी तालुकाध्यक्ष कैलास ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते किरण गुंजाळ, गोविंद अमोलिक, महेश मोरे, एकनाथ पवार, शहर संघटक संजय सूर्यवंशी, शहर संघटक कुष्णा सर कदम, अनिल त्रिभवन, मंगल पडींत, विजयाताई शेळके, दिपक मोरे, उज्वला त्रिभुवन, चंद्रकला पंडित, शारदाबाई पंडित, प्रसाद खरात इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.