दिव्यांगांचे कैवारी – मा.ना.बच्चू भाऊ कडू

33

लोकप्रिय लोकनेते तथा दिव्यांगांचे कैवारी,महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना.श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू यांचा आज ५ जुलै रोजी वाढदिवस आहे.दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रम राज्यभर घेतले जातात.मात्र यावर्षी संपूर्ण देशावर कोविड – १९ च्या वाढत्या संसर्गामुळे भीतीदाय व दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घेवून घरीच राहून आपल्या परिसरात एकातरी झाडाची लागवड करुन वृक्षलागवड संकल्प करु या असे आवाहन ना.बच्चू भाऊंनी वाढदिवसानिमित्ताने केलेले आहे.त्यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी घेतलेला त्यांच्या कार्याचा आढावा….

दिव्यांगांसाठी नेहमी झटणारा नेता जर कुणी विचारला तर मा.ना.श्री.बच्चू भाऊ कडू हे नाव पटकन डोळ्यांसमोर येतं.ते अचलपूरचे मतदार संघाचे आमदार आहेत.ते त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.प्रहार संघटनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन करुन त्यांनी स्थानिक प्रश्न आक्रमकपणे समोर आणले आहेत.नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात त्यांनी केलेल्या ” शोले ” आंदोलनाने ते विशेषतः प्रसिद्धीस आले.ना.बच्चू भाऊ कडू यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात एन.टि.पी.सी. प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्धही आंदोलन केले आणि त्यातून प्रकल्पग्रस्तांना स्थायी नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत.असे लोकहितवादी बरेच उपक्रम त्यांचे सतत सुरु असतात.त्यांनी दिव्यांगांसाठी आंदोलन छेडले आणि आपल्या आंदोलनाने त्यांनी दिल्ली दरबारही हलवलेला आहे.
त्यांनी केलेल्या अनेक लोकहीतवादी कामामुळे ना.बच्चू भाऊ कडू यांना लोकनेता म्हणून अधिक लोकप्रियता मिळाली आहे.तरूणांमध्ये त्यांची आक्रमकता अधिक पसंत केली जात आहे.

कोणताही थाट नाही,बंगला, आलिशान गाड्या घेऊन हा माणूस मिरवत नाही.अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे तो कार्यकर्त्यांमध्ये राहून काम करतो.म्हणूनच ना.बच्चू भाऊ कडू हे लोकनेता म्हणून ओळखले जातात.ना.बच्चू भाऊंच्या कार्याची रुग्णसेवेसारख्या समाजकार्यातून सुरूवात झाली.तसाच त्यांचा प्रवास “प्रहार” पक्ष स्थापना करण्यापर्यंत पोहोचला.ना.बच्चू भाऊंच्या विचारांची कुवतच त्यांना असामान्य ठरवते.मदत कुणाला,कुठे,कशी करावी हे बच्चू भाऊ कडूनच शिकावं.रुग्णसेवा करता करता रक्तदान – नेत्रदान आणि पुन्हा दिव्यांगांचे प्रश्‍न – समस्या.ना.बच्चू भाऊंनी आजपर्यंत अनेक दिव्यांगांना हरतर्‍हेने मदत केलेली आहेच तसेच दिव्यांगांच्या हितार्थ अनेक शासन निर्णय काढण्यासाठी सरकारला भाग पाडलेले आहे.

ना.बच्चू कडू यांनी लग्न केलं तेही गांधी जयंतीच्या मुहूर्तावर.होणारा खर्च टाळून दोन हजार दिव्यांगांना मदत केली.गळ्यात हार घातले नाहीत,तर तिरंगा झेंडा एकमेकांना दिला.मंत्र मंगलाष्टक गायली गेली नाहीत तर वंदेमातरम आणि राष्ट्रगीताच्या सुरावरती लग्न लावल.रात्री बारा वाजेपर्यंत विधानभवन चालायचे प्रसंग फार कमी आहेत,परंतु ही किमया आता पुन्हा घडत आहे.सतत अनेक दिवसापासुन सर्व कर्मचारी वाट बघत आहेत साहेब कधी थकणार परंतु हा माणुस थकतच नाही.रोज दिवसभर मिटींग व सायंकाळी कमीत कमी ५०० लोक आपल्या समस्या घेऊन विधानभवनात येत आहेत.त्यामुळे कार्यालय कमी पडत असल्याने त्यांचा जनता दरबार भरतो तो विधानभवनाच्या छतावर तर कधी समिती कक्षामध्ये.राज्यमंत्री ना.बच्चू भाऊ कडू या अवलियांनी विधानभवनाला जागे ठेवायचे काम सुरू केले आहे.काही विघ्नसंतोषी लोकांनी भाऊंना मंत्रालयात कार्यालय दिले नाही,बंगला देखील मलबार हिल व भाऊं कडे दिव्यांग येतात याचा देखील त्यांनी विचार केला नाही.

आपल्या या चाहत्यांसाठी बच्चू भाऊ रात्री १२ पर्यंत विधानभवनातच तळ ठोकुन बसलेले असतात.प्रत्येकाच्या समस्या तात्काळ सोडवणे हे कोणाला बघायचे असेल तर ना.बच्चू भाऊंचा हा जनता दरबार बघावा.रडत येणारे हजारो चेहरे रोज हसत चालले आहेत.दिवसभर मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडुन सायंकाळी ६ ते १० विधानभवनात लोकांच्या समस्या सोडवत आहेत.जेवण,चहा,पाणी विसरुन भाऊ लोकांच्या समस्या सोडवत आहेत. विधानभवनातील कॅन्टींग मालक असाच एकदा बोलता बोलता बोलला की,येवढ्या वर्षापासून मी इथे आहे परंतु पहिल्यांदाच अधिवेशन सुरू नसताना ३ वाजताच माझा नाश्टा,चहा,जेवण सर्व संपत आहे.यावरुन गर्दीचा अंदाज आपण लावू शकता.वास्तविक पहाता अश्या गोष्टींना फार काही प्रसिद्धी मिळत नाही.ही वस्तुस्थिती लोकांपर्यत पोहोचविणे ही महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक दिव्यांगांची आहे.असे मला ठाम सांगावेसे वाटते.

सर्वांना बच्चू भाऊ पुढील गोष्टीमुळेच आवडतात.निस्वार्थी माणूस – बच्चू भाऊ हे असे व्यक्ती आहेत की,कसलाही स्वार्थ मनात ठेवून काम करत नाहीत,जे काही करतात ते जनतेच्या हितासाठी व भल्यासाठीच.काम करून घेण्याची ताकद – अधिकारी वर्गाकडून काम करून घेण्याची ताकद या माणसात आहे,पोकळ आश्वासन देऊन लोकांच्या मनाचे समाधान करणे या माणसाला कधीच जमल नाही.साधेपणा – बच्चू भाऊ आज राज्यमंत्री पदावर आहेत पन त्यांचं राहणीमान अगदी साधे आहे,मी बच्चू भाऊ यांच्या पोशाखाचे नेहमी निरीक्षण करीत आलो आहे,त्यांच्या पायामधील चप्पल ही साधी असते,अंगावरचे कपडे सुद्धा अतिशय साधे असतात,एवढा मोठा माणूस अगदी साधेपणाने आयुष्य जगतो,साधी राहणी,उच्च विचार.याचा नक्कीच सार्थ अभिमान एक कार्यकर्ता शुभचिंतक म्हणून मला आहे.अमाप संपत्ती जमवली नाही – राजकारण म्हटलं की कमाई ही आलीच,राजकारणामधून कित्येक लोकांनी नको तेवढी संपत्ती जमा केली,पण कित्येक वर्षांपासून जी व्यक्ती आमदार आहे,ती व्यक्ती आज सुद्धा एका बांबूच्या घरात आपलं कुटूंब वास्तवास ठेवते.ही बाब मनाला स्पर्श करुन जाते.कार्यकर्त्यांची जाणं आहे – भाऊ सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भाऊंना जाण आहे,सोबतच्या लोकांना खाली झोपून स्वतः भाऊ कधी मखमलीच्या गादीवर झोपणारा माणूस नाही,सोबत असणारी माणस गादीवर झोपून स्वतः खाली झोपणारा माणूस म्हणजे बच्चू भाऊ.दिव्यांग लोकांचा आधार – आजपर्यंत दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न सोडविण्यासाठी भाऊने अतोनात प्रयत्न केलेले आहेत.

कित्येक आंदोलन केली.दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी ही व्यक्ती सदैव अन्यायाविरुध्द लढून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे.अश्या कित्येक बाबी आहेत की,सांगाव्यात तेवढ्या कमीच आहेत.या सर्व गोष्टींमुळेच भाऊ दिव्यांगांचे कैवारी म्हणून ओळखले जातात.मा.ना.बच्चू भाऊंना वाढदिवसा निमित्ताने दिर्घायुष्य लाभो,त्यांच्या हातून शेतकऱ्यांचे व दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.शेवटी सर्वांना माझा मानाचा जय प्रहार.

✒️लेखक:-राजेंद्र लाड (आष्टी,जि.बीड)प्रहार सैनिक बीडमो.९४२३१७०८८५