शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यवाही न केल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक थेट जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिनांक ८ जुलै ला बेमुदत आमरण उपोषण…!

26

🔸शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यप्रणाली होणार उघड(?)

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.4जुलै):- शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे गणेश अलंकार विद्यालय निमगांव येथील मुख्यधापक यांची तक्रार देण्यात आली मात्र चार महिने लोटुनही कोणतीही चौकशी व कार्यवाही करण्यात आलेली नाही म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक यांनी थेट जिल्हाधिकारी यांना बेमुदत आमरण उपोषणाची नोटीस देण्यात आले.

या आंदोलनात गणेश अलंकार विद्यालय निमगांव येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्या बाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, महात्मा गांधी विद्यालय आरमोरी येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, बोगस अप्रोलची चौकशी करण्यात यावी, जिजामाता हायस्कूल ईरुपटोला येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचा निलंबनाचा प्रस्ताव सादर करून चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.दिनांक ५ जुलै २०२१ पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक ८ जुलै २०२१ ला दुपारी ठिक १:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.