अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी मौलाना आजाद शैक्षणिक कर्ज व डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा – शेख मुदस्सिर

30

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.4जुलै):-राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक उन्नती साठी मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मार्फत उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरू असून अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शेख मुदस्सिर यांनी केला आहे.या महा मंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाज (मुस्लिम, बौद्ध, जैन, सिख, खिश्चन, पारसी व ज्यू) या समुदायातील गरजु विद्यार्थ्यांसाठी व्यवसायीक, तांत्रिक सारख्या उच्च अभ्यासक्रमाकरीता (उदा. B.Ed,MBBS,BHMS, BE, etc.) मौलाना आजाद शैक्षणिक कर्ज योजना व Dr APJ अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना राबवली जात आहे.

या योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते.सदरील योजनेची माहिती खालील प्रमाणे आहे.
(1) मौलाना आज़ाद शैक्षणिक कर्ज योजना : कर्ज मर्यादा रु.२.५० लाखांपर्यंत. व्याजदर – फक्त ३%, १००% कर्ज , परतफेड : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५ वर्षे,
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखांपर्यंत, विद्यार्थ्याचे वय : १८ ते ३२ वर्षे.
2) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना : कर्ज मर्यादा रु. ५.०० लाखांपर्यंत, व्याजदर – फक्त ३%, १००% कर्ज, परतफेड : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५ वर्षे. , कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा – शहरी भागासाठी रु.१,२०,०००/- पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी रु. ९८,०००/- पेक्षा कमी., विद्यार्थ्याचे वय : १६ ते ३२ वर्षे.
सन २०२१ -२०२२ या वर्षासाठी अर्ज स्विकारले जात आहेत.

सदर योजनेसाठी
https://malms.maharashtra.gov.in किंवा www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. अर्जाच्या प्रिंट आउट सोबत संपुर्ण मुळ / छायांकित कागदपत्रे जिल्हा कार्यालय रब्बानी मंजिल २ रा मजला एस पी ऑफिस समोर रेहमत नगर बीड येथे जमा करावीत. अधिक माहिती करीता मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे बीड जिल्हा व्यवस्थापक सय्यद इम्रान काद्री सर ९८२२८४८८७८ यांच्याशी संपर्क करावा. अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शेख मुदस्सिर यांनी केला आहे