“युथ आयकॉन अवॉर्ड-2021” ने युवा सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

22

🔸महाराष्ट्र युवा संम्मेलनात ब्रह्मपुरीतील युवकांचा विशेष सन्मान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.5जुलै):- नॅशनल ह्यूमन वेलफेअर कौन्सिल, दिल्ली या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यात प्रथमच उपराजधानी नागपूर शहरात ४ जुलै २०२१ रोजी रविवारला, महाराष्ट्र युवा संमेलनात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या निवडक लोकांना सन्मानित केल्या गेले.यात, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विभागात सामाजिक कार्य करीत असलेले, युवा वर्ग कुमारी.पुनम कुथे, भूषण आंबोरकर, उदयकुमार पगाडे, चक्रधर आठवले अश्या चार युवकांना संस्थेचे चेअरमन श्री.गुंजन शर्मा सर आणि इतर अन्य मान्यवरांच्या हस्ते “युथ आयकॉन अवॉर्ड-२०२१” हा पुरस्कार देत गौरव करण्यात आले.

मागील ५ वर्षात ह्या चारही युवकांनी विदर्भातील बहुसंख्य रुग्णांना रक्ताची मदत, गाव खेड्यातील लोकांना अनेक विषयांवर मार्गदर्शन व मदत, वृक्षारोपण उपक्रम, कोरोना काळात गरजू लोकांना धान्य किट, मास्क, सॅनिटायजरचे वाटप, आणि ईतरही अनेक लहान मोठे उपयुक्त कार्य करीत समाजात निःस्वार्थ मदत केलेले आहे. ह्या सर्वांना सन्मान स्वरूपात ट्रॉफी, सर्टिफिकेट, मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.