गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे दडवून ठेवणाऱ्यास पोलिसांनी केले गजाआड

20

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.7जुलै):- गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे दडवून ठेवणाऱ्या एकास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक पथकाने मंगळवारी गजाआड केले आहे या संशयिताने त्याच्याकडे असलेला मुद्देमाल धृवनगर येथील ड्रेनेजमध्ये दडवून ठेवला होता आशिष सुनील दत्त महिरे 24 राहणार निगळ पार्क समोर पुष्प कोटी बंगलो शिवाजीनगर अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

महिरे कडे बेकायदेशीर पिस्तूल असल्याची माहिती युनिट प्रवीण वाघमारे यांना मिळाली पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांनाही माहिती दिल्यानंतर पथकाने संशय आताचे घर गाठले यावेळी पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने पिस्तोल असल्याची कबुली दिली संशयितांनी हे पिस्तूल व काडतुसे धृवनगर मधील मोकळ्या फ्लॅटच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक पोल च्या शेजारी ड्रेनेज मध्ये प्लास्टिक पिशवी मध्ये दडवून ठेवले होते हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला हे हत्यार त्यांनी आपल्या मित्राकडून घेतल्याची कबुली दिली पोलिस त्याचा शोध घेत आहे