बौद्ध स्मशनभूमी मध्ये वृक्ष लागवडीला सुरूवात

21

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.7जूलै):-शहरातील बौद्ध धार्मियांची एकमेव असलेली बौद्ध स्मशनभूमी मध्ये बोधी वृक्ष पिपळाचे झाड लावून सुरुवात केली.आज फुटपाथ युनियनचे अध्यक्ष, भीम टायगर सेना तालुका संपर्क प्रमुख, अध्यक्ष शांतिदुत समिती तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नविन पुतळा निधी संकलन समितीचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय *कुमार केंद्रेकर साहेब* यांच्या वाढदिवसानिमित्ताने बोधी वृक्ष पिपळाचे झाड लावून वृक्षारोपणच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यापुढे अनेक झाडे लावून त्या झाडाचे संगोपन करणार. असे मत सिध्दार्थ दिवेकर व्यक्त केले.याप्रसंगी कुमार केंद्रेकर, सिध्दार्थ दिवेकर, तुषार पाईकराव, प्रफुल दिवेकर, दिलिप धुळे, बुद्धभूषण इंगोले, सम्यक इंगोले आदित्य आठवले इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.