विषारी व बिनविषारी साप संदर्भात समज व गैरसमज बद्दल जणजागरण मोहीम

23
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.7जुलै):-श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या प्राणीशाश्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सर्पमित्र गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने विषारी व बिनविषारी साप बद्दलचे समज व गैरसमज या विषयाच्या माध्यमातून जण जागरण केले जाते याच मोहिमेचा भाग म्हणून दि.०३/०७/२०२१ रोजी मौजे खळी ता. गंगाखेड जि.परभणी येथे घोणस (Russels Wiper ) या प्रजातीचा विषारी साप सापडला तो साप पकडल्या नंतर असे लक्षात आले कि हा साप मादी असून गर्भ धारणा केलेली निदर्शनास आली आणि ती मादी प्रसूतीच्या तयारीत होती .आम्ही बचाव कार्य केल्या नंतर जंगलात सोडण्याचा प्रयत्न केला असता ती जात नव्हती.तेव्हा पुणे येथील तज्ज्ञ सर्प मित्र श्रीकांत भाडळे यांचे मार्गदर्शन घेतले.त्यांनी आम्हाला असा सल्ला दिला कि दोन दिवस हा साप सर्पमित्राच्या निगराणी खाली ठेवा असे सांगितले.
हा साप सर्पमित्र चेतन लांडे यांच्या घरी निगराणी खाली असताना ३० घोणस जाती च्या पिलांना जन्म दिला. त्या नंतर ती पिले व मादी निर्जन स्थळी जंगलामध्ये सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.या जण जागरण मोहिमेसाठी जे काही साहित्य लागते ते साहित्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.धूत उप प्राचार्य डॉ.सि.बी. सातपुते,उप प्राचार्य डॉ.डी.जी.उजळंबे यांनी उपलब्ध करून दिले.तसेच जण जागरण मोहिमेसाठी सर्पमित्र किरण भालेराव व सर्पमित्र चेतन लांडे, प्रा.डॉ.सुर्वे पी. आर. प्राणिशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी हे सर्व जण नेहमी परिश्रम घेत असतात.