रिपब्लिकन सेना उमरखेड तर्फे आयोजित पक्ष बांधणी व बैठक

26

🔹रिपब्लिकन सेनेच्या कार्यप्रणालीने राजकीय वर्तुळात हलचाली सुरू

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड दि. 7 जुलै रिपब्लिकन सेना उमरखेड तर्फे आयोजित पक्ष बांधणी व बैठक कार्यक्रम संपन्न झाली.

यावेळी मा.तातेरावजी हनवते साहेब (जिल्हाध्यक्ष), मा.कैलास पवार साहेब (उप जिल्हाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली देवानंद पाईकराव साहेब (तालुका अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन सेना राजकीय पक्ष आढावा बैठक व पक्ष बांधणी कार्यक्रम उमरखेड येथे पार पडला.रिपब्लिकन सेनेच्या या बैठकीमुळे इतर राजकीय पक्ष गांभीर्यपूर्वक लक्ष ठेवून अप्रत्यक्ष हालचालीला प्रारंभ केल्याचे जनतेच्या चर्चेतून दिसून येत आहे.

यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.येणाऱ्या काळात पक्षाची असणारी धोरणे, भुमिका, रूपरेषा व येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या रिपब्लिकन सेना भव्य पक्ष प्रवेश सोहळ्या बद्दल आराखडा तयार करण्यात आला.

वार्ड व प्रभाग कमेट्या, गाव तिथे शाखा बनविण्यावर भर देऊन तसेच येनाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कार्याला लागावे अशा मार्गदर्शन व सुचना तातेरावजी हनवते यांनी दिल्या.येणारा काळ हा फक्त रिपब्लिकन सेनेचाच असेल आपण “गाव तेथे शाखा-घर तिथे कार्यकर्ता” मोहीम राबवण्याचा तयारीला लागा अश्या सूचना आद. कैलास पवार साहेबानी (रि.प सेना उप जिल्हाध्यक्ष यवतमाळ) यांनी दिल्या.

आपापसातील मतभेद विसरून गैरसमज दूर करून सामुहिक भावनेने एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून सुखदुःखात सहभागी होऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा असे आव्हान मा.करण भरणे (मा.ता.प्रमुख उमरखेड) यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले त्याच बरोबर मार्गदर्शक सूचना व आपले मोलाचे अनुभव मांडले.अनेक सामाजिक कार्यकर्ते व इतर पक्षातील पदाधिकारी रिपब्लिकन सेने मध्ये येण्यास इच्छुक असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदविली होती.सर्वसामान्य जनता आता इतर पक्षांना कंटाळलेली आहे. सध्याच्या काळात मा.आनंदराज साहेब हाच एक पर्याय म्हणून जनतेच्या मनात आशेचा किरण दिसत आहे. आपण सर्व मिळून आद.सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचे हात बळकट करूया व तरुण मनाच्या, बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून पीडित, शोषित वंचित, घटकांना न्याय मिळून देऊया!

या प्रसंगी एम.डी.कोकणे साहेब (जिल्हा महासचिव) उमरखेड महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष्या लिलाबाई लक्ष्मण हटकर,सुनिल पाटील चिंचोलकर (शहराध्यक्ष) देवानंद पाईकराव (तालुका प्रमुख) गौतम नवसागरे (तालुका उपप्रमुख) अरविंद धोंगडे साहेब (तालुका महासचिव) शंकर सुळ (उपसरपंच पिरंजी, यशवंत सेना तालुका प्रमुख) संतोषजी भवाळ (ग्रा.पं.सदस्य पिरंजी, आदिवासी समाजाचे युवा नेतृत्व) प्रकाश पोपुलवाड, बबन वाठोरे, समथ पठाण, कृष्णाजी लोखंडे ग्रा.पं. सदस्य पिरंजी) प्रकाश धोंगडे, संजय धुळे, विनोद गाडगे (ता.सचिव) प्रकाश वाहुळे (सदस्य) इंदुबाई उत्तमराव मनवर उज्वलाबाई रवी धुळे व इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच साहेबराव कदम, कैलास खडसे, शुद्धोधन दिवेकर , , प्रकाश इंगोले, परमेश्वर काळे, प्रभाकर सावते इतर मान्यवर उपस्थित होते.