नगर परिषद शाळा प्रवेश क्षमता संपली?-नगरपरिषद शहीद भगतसिंग शाळेची उत्तुंग कामगिरी!

    33

    ?प्रवेश क्षमता संपल्याचा बोर्ड पहिल्यांदा झळकला-पालक वर्ग अचंबित

    ✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)मो:-9823995466

    उमरखेड(दि.9जुलै):-नगर परिषद शाळेत प्रवेश क्षमता संपली असा बोर्ड वाचून नवल वाटले असेलच हो…पण हे सत्य आहे आणि अगदी त्रिवार सत्य.आहेशहीद भगतसिंग न.प. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, उमरखेड जि. यवतमाळ या शाळेत इयत्ता 1 ली आणि 2 री साठीची प्रवेश क्षमता संपली आहे. असा बोर्ड शाळेच्या समोर झळकत आहे.प्रवेश क्षमता संपली…हे वाक्य वाचायला अगदी लहान वाटतं असेल तरी त्या वाक्याला पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व शिक्षकांचे श्रम मात्र लहान नाहीत. सर्वच पालकवर्गाची मानसिकता, नगर परिषद शाळेकडे त्यांचा पाहण्याचा कल, शासकीय यंत्रणेची उदासीनता यासारख्या अनेक कारणांमुळे नगर परिषद शाळेत विद्यार्थ्यांची वानवा दिसून येत आहे.

    परंतु उमरखेड येथील नगरपरिषदेची भगतसिंग उच्च माध्यमिक शाळा सर्व गोष्टीला मात्र अपवाद ठरली आहे.शाळेतील सर्व शिक्षकांनी या शाळेचा दर्जा खासगी शाळेच्या बरोबरीच्या तुलनेत आणून सर्वांना एक प्रकारे अचंबित केले.शैक्षणिक दर्जा, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, यासारखे अनेक उपक्रम राबविल्याने शाळेला पहिल्याच वर्गासाठी प्रवेश क्षमता संपली असा बोर्ड लिहिण्याची वेळ जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याने सामान्य पालकवर्ग मात्र अचंबित झाला व त्याचबरोबर आनंदी सुद्धा झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

    इयता 1 ली साठी दरवर्षी पटनोंदनी करतांना अनेक शिक्षकांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो,, पण तरी देखील महत्प्रयासाने अगदी मोजके प्रवेश होतात.या दुर्दम्य परिस्थितीत शहीद भगतसिंग न.प माध्यमिक शाळा, उमरखेड जि. यवतमाळ या शाळेत इयत्ता 1 ली आणि 2 री मध्ये प्रत्येकी 60 विद्यार्थी झाल्याने प्रवेश बंद करावा लागला, ही सर्वच नगर परिषद शाळा आणि शिक्षकांसाठी अभिमानास्पद बाब आहे.या यशाचे गमक शाळेच्या सर्व स्टाफ ने केलेले अतोनात श्रम आणि शैक्षणिक कौशल्य आहे. हे सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

    शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती पोफाळकर मॅडम,श्री.वि.ना.सुर्यवंशी, श्री.कि.द.आडे, श्री. यो.मा बुरफूले, श्री. रा.प्र. कोरडे,श्री. टि.रा. चौधरी ,श्री.आ.ल. राठोड, कु. शार्पिना हिंगोले, कु.आर्चना म्हेसकर,कु.भाग्यश्री सोनेवाड, कु.आर्चना नंदनवार, डाॕ. सु ग कवडे, श्री.एस एस काळे, श्री.एस के काळे,कु. सविता कदम सौ.अनिताताई वाढवे (शा. व्य.स. अध्यक्ष) प्रकाश दुधेवार (न प शिक्षण सभापती) इत्यादी उपस्थित होते.आणि त्यांच्या सर्व चमू चे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या कार्याला सर्वच पालक वर्गाने मनापासून आनंद व्यक्त केला आहे.