कागदपत्रेकरिता पालकांची अडवणुक करता येणार नाही

27

🔸गटशिक्षणाधिकारी यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांना पत्र

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

शेगाव(दि.9जुलै):- इयत्ता 1 ते 12 च्या विदयार्थ्यांचे शुल्क भरणा न केल्याने विदयार्थ्याची टिसी , मार्कशिट , निकाल व इतर कागदपत्रेकरिता पालकांची अडवणुक करता येणार नाही . तसेच दि .11.06.2004 चे शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करण्याबाबत आपणास या आधीच सूचित केले आहे . पंरतु अदयापही शुल्क न भरल्यामुळे वरील बाबतीत विदयार्थ्याची अडवणुक शैक्षणिक संस्थांकडून केली जात असल्याचावत तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत .

याव्दारे आपणास सूचित करण्यात येते की , शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून विदयाथ्यांची टिसी , मार्कशीट निकाल व इतर कागदपत्रे रोखण्यात येवु नये , तसेच विदयार्थ्या ना कोणत्याच प्रकारच्या लाभारासुन वंचित ठेवण्यात येवु नये यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधीत शाळेविरुध्द नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी .