उद्धव ठाकरे यांच्या हातात राज्य व जनता सुरक्षित असल्याचा जनसामान्यांना विश्वास — बदामराव पंडित

41

🔹उधोजक मधुकर मस्के यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.11जुलै):-तालुक्यातील आंतरवाली येथील रहिवासी असलेले मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष उद्योजक मधुकरराव मस्के यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित असल्याचा विश्वास जनसामान्यात असल्याचे प्रतिपादन बदामराव पंडित यांनी यावेळी केले.

मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष तथा उद्योजक मधुकरराव मस्के यांनी दि 9 जुलै रोजी आपल्या असंख्य सहकार्‍यांसह अंतरवाली येथे झालेल्या कार्यक्रमात, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. याप्रसंगी जिपचे माजी अर्थ व बांधकाम सभापती यूद्धजीत पंडीत माजी सभापती पंढरीनाथ लगड पंचायत समिती माजी सभापती अभयसिंह पंडित जि प सदस्य युवराज डोंगरे माजी सभापती गीताराम डोंगरे शिवसेना तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे, पिंटू गरजे, डॉ रामकीसन वावरे, परमात्मा बोराडे, संतोष पारीख, दशरथ धुमक, अशोक मस्के, आप्पा चौधरी, विष्णू उमप, अशोक उमप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उद्योजक मधुकर मस्के यांच्यासह संकेत वावरे, प्रकाश कर्डिले, विठ्ठल कर्डिले, विष्णू वावरे, आकाश पंडित, आकाश मस्के, प्रतिक मस्के, अंकुश पंडित, भीमराव वावरे, अमोल वावरे, अनिल गायकवाड, विलास वावरे, भगवान गायकवाड, गणेश मस्के, नजीरभाई शेख, शेख जफरभाई, दिगंबर पंडित, सतीश साखरे, गणेश राऊत, कैलास माने, प्रकाश मकासरे, हसन पठाण, दशरथ सुपेकर, हसनभाई सय्यद, भाऊसाहेब कर्डिले आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला माजी मंत्री बदामराव पंडित यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, कोरोनाच्या गंभीर स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौशल्याने योग्य रीतीने परिस्थिती हाताळली. सामान्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

त्यासोबतच विकासाची गतीही कमी होऊ दिली नाही. त्यामुळेच उद्धवजी ठाकरे यांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना आणि विश्वास जनसामान्यांमध्ये पाहायला मिळतो. गेवराई तालुक्यातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आपण स्वतः पाहिजे असलेली मदत प्राधान्याने केली. अनेकांना बेड उपलब्ध करून दिले. कोरणा रुग्णांना धीर आणि विश्वास देणे अत्यंत गरजेचे असताना ते आपण प्राधान्य केले, असे सांगून गोरगरीब आणि सामान्यांची कामे सातत्याने करत असल्याने आज पर्यंत मतदार संघातील जनतेने कायम मला साथ दिलेली आहे. यात गोरगरीब आणि ओबीसी समाज बांधवांनीही मोठी ताकद सातत्याने माझ्या पाठीशी उभा केलेली आहे, हे मी कधी विसरू शकत नाही.

येणाऱ्या काळात नव्या उमेदीने आपण शिवसेनेची मोर्चेबांधणी करणार असून, सामान्य कार्यकर्त्याला योग्य न्याय देणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख रफिक भाई यांनी केले. कोरूना बाबत योग्य ते नियम पाळून कार्यक्रमास त्रिंबक वावरे, चत्रभुज पंडित, भागवत पंडित, बंडू इंदलकर, सुनील गायकवाड, दामू वावरे, गणेश वावरे, अर्जुन वावरे, शेख महेमुद, दत्तात्रेय धोत्रे, सुभाष शिंदे, रामहरी वावरे, आसाराम शिंदे, योगेश वावरे, प्रल्हाद मस्के, सुरेश वावरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.