भीम आर्मी सम्यक संवाद यात्रेला उत्तम प्रतिसाद

24

🔹वऱ्हाडी मने जिंकून खान्देशात प्रवेश

✒️संजय कोळी विशेष प्रतिनिधी)

धुळे(दि.11जुलै):- सातपुड्याच्या पायथ्याशी ४ तालुक्यांसोबत गगनभरारी घेणारा धुळे जिल्हा वेगाने भीम आर्मीमय होत आहेत.भीम आर्मीला संपूर्ण महाराष्ट्रात सशक्त करण्यासाठी , भीम आर्मीच्या बळकटीकरणासाठी आणि दुभंगलेली मने पुन्हा सांधण्यासाठी भीम आर्मीचे जाणते राज्यप्रमुख , समाजरक्षक कर्मयोद्धा मा.प्रफुल्लभाई शेंडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ८ जुलै पासून राज्यव्यापी “सम्यक संवाद” यात्रेच्या पहिल्या टप्प्याला जोरदार सुरुवात झाली असून सम्यक संवाद यात्रेला न भूतो इतका प्रचंड प्रतिसाद मिळून , सगळी मरगळ झाडून कार्यकर्ते जोमाने कार्यरत झालेली बघावयास मिळत आहे.
दौऱ्याची सुरुवातच मुळात सम्यक संवाद यात्रा” खान्देशच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहे.

तेलगी प्रकरणात धुळे जिल्हा आणि घरकुल प्रकरणात जळगाव जिल्हा जरी बदनाम झाले असले तरी सध्याच्या व पुढील काळात धुळे जिल्हा भीम आर्मीचे बालेकिल्ला म्हणूनच ओळख निर्माण करीत असून , प्रदेशाध्यक्ष मा.प्रफुल्लभाई शेंडे यांच्या स्वागतासाठी धुळे नगरी सज्ज झाली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह ओसंडून वहात आहे. धुळे जिल्हाप्रमुख मा.संजुबाबा चव्हाण उर्फ रावण व त्यांची संपूर्ण टीम स्वागतासाठी सज्ज झाली होती. दि.10 जुलै रोजी मा. प्रफ्फुल भाई शेंडे ,राज्य प्रवक्ते मा. रमाकांत जी तायडे हे नंदुरबार दौऱ्यावर सकाळी जात असतांना दोंडाईचा येथे भीम आर्मी शिंदखेडा तालुका अध्यक्ष व जिल्हा महासचिव नवनीतजी बागले यांच्या आग्रहास्तव भीम आर्मी राज्य प्रमुख प्रफ्फुलभाई शेंडे व राज्य प्रवक्ते रमाकांत जी तायडे साहेब यांनी दोंडाईचा येथील व परिसरातील भीम आर्मीचे असंख्य कार्यकर्ते यांची भेट घेतली व पुढील कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या व सत्कार स्वीकारला.
यावेळी दोंडाईचा येथील दलित चळवळीचे नेते व माजी उप नगराध्यक्ष रामभाऊ माणिक, मक्कन माणिक ,सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील,जिल्हा महासचिव नवनीतजी बागले, शिंदखेडा तालुका अध्यक्ष दिनेश बेडसे यांनी राज्य प्रमुख यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजयजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार व जिल्हा महासचिव नवनीत बागले यांच्या प्रमुख उपस्थितीत दोंडाईचा येथील विश्राम गृहात भीम आर्मी शिंदखेडा तालुका अध्यक्ष दिनेश बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदखेडा तालुका कार्यकारणी व दोंडाईचा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिंदखेडा तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे
कृष्णा साळवे (मालपूर) भीम आर्मी शिंदखेडा तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष, मनोज कुवर (अमलथे) भीम आर्मी शिंदखेडा तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष, विशाल बागले (बाम्हणे) भीम आर्मी शिंदखेडा तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष, विनोद रामराजे (कोलदे) भीम आर्मी शिंदखेडा तालुका महासचिव,किशोर काळोंखे (रहिमपुरे) भीम आर्मी शिंदखेडा तालुका सचिव,समाधान तिरमले (विखुरले)भीम आर्मी शिंदखेडा तालुका सचिव,सागर पाटील (कुरुकवाडे)भीम आर्मी शिंदखेडा तालुका सचिव, रावसाहेब पगारे ( कोलदे) भीम आर्मी शिंदखेडा तालुका सचिव,राहुल इंदवे (मालपूर) भीम आर्मी तालुका संघटक, नाहनु केदार (विखुरले) भीम आर्मी शिंदखेडा तालुका संघटक, भाऊसाहेब भिल (जोगशेलू) भीम आर्मी तालुका सह संघटक, कपिल इंदवे ( मालपूर) भीम आर्मी शिंदखेडा तालुका सोशल मीडिया प्रमुख),मोनू मन्सूरी भीम आर्मी दोंडाईचा शहर अध्यक्ष, किशोर सुतारे भीम आर्मी दोंडाईचा शहर सचिव, सर्व शिंदखेडा तालुका भीम आर्मीचे नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडीबद्दल भीम आर्मी राज्य प्रमुख मा. प्रफ्फुलभाई शेंडे राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे, राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब रामकृष्ण नेरकर, जिल्हा अध्यक्ष संजुबाबा चव्हाण, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर सुतारे, जिल्हा महासचिव नवनीत बागले व शिंदखेडा तालुका अध्यक्ष दिनेश बेडसे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.