इंधन दरवाढी मुळे महागाई चा आगडोंब

    42

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.11जुलै):-महागाई मुळे जनतेचे होत आहेत हाल इंधन दरवाढ सतत होत असल्यामुळे जनतेची आर्थिक पिळवणूक होताना दिसते.महागाई मुळे होत आहेत हाल आर्थिक स्थिती आधीच कोलमडली असून, लॉकडावून मुळे परस्थिती बिकट झाली आहे त्यातच बेरोजगारी प्रमाणात मोठी वाढ झाली असून अनेकांना रोजगार उपलब्ध नाहीत .

    केंद्र सरकार मात्र इधन दरवाढ कमी करण्याच्या मनःस्थितीत नाही या इंधन दरवढीचा परिणाम वाहतूक खर्च मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या मुळे भाज्या, डाळी ,आणि जीवनावश्यक वस्तूच्या माल वाहतूक करणारे वाहतुकीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात भाडे वाढ झाल्यामुळे किरकोळ व घावूक बाजारा मध्ये जीवन आवश्यक वस्तूच्या भावात वाढ झाली असून महागाईचा आलेख वाढतच आहे याचा परिणाम सर्व जनतेवर होत आहे