भोजराज धोटे यांचे दु:खद निधन

21

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.12जुलै):-कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मारक जवळ ब्रह्मपुरी येथील ने.हि. कन्या विद्यालय, ब्रह्मपुरी येथील माजी उपमुख्याध्यापक भोजराज धोटे वय 59वर्ष यांचे अल्पशा: आजाराने रविवार दि. 11जूलैला सायंकाळी ,6.50 ला दु:खद निधन झाले. त्याच्या पश्चात वडिल,एक भाऊ, पत्नी, दोन मुले व पुतणी असा आप्त परिवार आहे.

ते 1987 ला ने.हि.शिक्षण संस्थेच्या शाळेत रुजू झाले,व मार्च 2021 पर्यंत कार्यरत होते.नुकतेच मार्च 2021 ला ने.हि.कन्या विद्यालय ब्रह्मपुरी येथे ऊपमुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाले.त्यांनी ने.हि.विद्यालय ब्रह्मपुरी व ने.हि. कन्या विद्यालय ब्रह्मपुरी येथे एकुण 33 वर्ष सेवा दिली.त्यांनी आपल्या सेवा काळात शिकवीत असलेल्या विषयावर प्रभावी अध्यापन केले. त्याचा अंत्यसंस्कार भू -वैकुंठ मोक्षधाम भूती नाला ब्रम्हपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्या निधनामुळे कुटूंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.