जनता रेल्वे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत

    42

    ?सर्वसामान्यांचे गरीब व मध्यम वर्गीय लोकांची प्रवासाची कोंडी

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि.120जुलै):- सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन असलेली रेल्वे दीड वर्षापासून काही विशेष मार्ग सोडले तर बंदच आहे.गरीब व मध्यम वर्गीय लोकांसाठी असलेला सोईस्कर जन रेल्वेचा प्रवास स्वस्त व सुलभ आहे. परंतु कोरोना महामारी मुळे प्रवासावर बंदी आली. प्रवासाची सर्व साधने बंद करण्यात आलीत. सध्या कोरोनाचा धोका कायम असला तरी काही प्रमाणात प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. तरीही रेल्वेची चाके रुतलेलीच आहेत. पुढे किती काळ स्तब्ध राहील हे ही कुणी सांगू शकत नाही. पण सर्व सामान्य प्रवासी, शेतमालाची वाहतूक करणारे छोटे धंदेवाले, रेल्वे स्टेशनवर व्यवसाय करणारे आदी सर्व प्रवासी रेल्वे सुरू होण्याची आतुरतेने वाट पहात आहेत.

    कोरोणा मुळे सर्व व्यवस्था कोलमडली आहेत. पण सर्वाधिक भार गरीब व मध्यवर्गीय यांना पडलेला आहे. अश्यातच या वर्गाची प्रवासाची मुख्य साधन असलेली प्रवासी रेल्वे बंद असल्यामुळे यांचे जीवन ठप्प झाल्यासारखे आहे. त्यामुळे सर्वजण रेल्वेची झुकझुक सुरू होण्याची आतुरतेने वाट पहात आहेत.