लोकतांत्रिक जनता दलाचे तहसील वर निदर्शने

31

🔹निराधारांच्या मागन्यात पालकमंत्र्यानी लक्ष घालावे – सलिम बापू

✒️माजलगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

माजलगाव(दि.१२जुलै):-तालुक्यातील निराधार ,शेतकरी ,शेतमजूर आदिच्या पगारी , राशन व न्याय हक्क्याच्या विविध मागण्या प्रलंबित असून प्रशासन या गोरगरीब जनतेच्या मूलभूत गरजा कडे मुद्दाम लक्ष देत नाही या साठी लोकतांत्रिक जनता दलाचे वतीने जिल्हाध्यक्ष सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील वर भव्य निदर्शने करण्यात आली.सदरील प्रकरणी दि ५ जुलै रोजी येथील तहसीलदार यांना निवेदन दिले होते मात्र या प्रकरणी कुठलीही कार्यवाही न झाल्याने आज दि १२ जुलै सकाळी ११ वा लोक तांत्रिक जनता दलाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली खालील न्याय व हक्काच्या मागण्या साठी हे निदर्शने आंदोलन करण्यात आली.

यात १) संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ, अपंग अशा निराधार लाभधारकांना प्रतीमहा ५००० रुपये वेतन देण्यात यावे.२) जिल्हा मध्यवर्ती बँक व माजलगाव पोस्ट ऑफीस मधील लाभधारकांचे खाते तेथेच ठेवून नविन खाते उघडण्यास तात्काळ आदेशीत करावे ३)निराधार लाभधारकांना शासन जी. आर. प्रमाणे पिवळ्या शिधापत्रिका देण्यात यावे.
४) निराधार लाभधारकांची मुलांची जाचक अट रद्द करण्यात यावी.
निराधार लाभधारकांना प्रतीमहा २५ किलो धान्य मोफत देण्यात यावे.
अन्नसुरक्षा योजना मधील लाभ धारकांना अंत्योदय मध्ये समाविष्ठ करण्यात यावे.
माजलगाव शहरामध्ये डि.आर.डी.चे सर्व्हे करण्यात यावे व डि.आर.डी. मधील उत्पन्नाची जाचक अट रद्द करण्यात यावी. या मागण्याचा यात समावेश आहे. या प्रकरणी पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी जातीने लक्ष घालूल गोरगरीब जनतेची होणारी हेळसांड थांबावी अशी मागणी ही सलीम बापू यांनी प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केली . या निदर्शने आंदोलनात महिला व अनेक गोरगरीब नागरिक मोठ्या संख्येने हजर होते . मागण्याचे निवेदन तहसील चे साबणे यांना देण्यात आले या वेळी शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय भटकर हे हजर होते.