साताऱ्याच्या युवकाने बनवले अनोखे ऊस भरणी व वाहतूकीचे यंत्र…!!!

25

🔹आ.सुरेश धस यांनी घेतली भेट

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

सातारा(दि.12जुलै):- जिल्ह्यातील रामकृष्णनगर येथे राहणार युवक अभियंता सनी दिलीप काळभोर (मँकँनिकल इंजिनियर) या युवकाने ऊसतोड कामगारांच्या जीवनात व कामात नवी क्रांती घडवून आणली आहे.ऊसतोडणी कामगारांना फडात ऊस वाहतूक व ऊस भरणी करण्यासाठी मशीन बनवल्याचे आ.सुरेश धस यांना काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती.
सोमवार दि. १२ रोजी त्यांनी सनी काळभोर यांच्या रामकृष्णनगर या गावी जाऊन त्या मशीन विषयी माहिती डेमोच्या माध्यमातून समजून घेतली.ही मशीन राज्यातील १४ लाखांवर असलेल्या ऊसतोडणी कामगारांना दिलासा देणारी आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात ट्रक व ट्रॅक्टरने ऊस वाहतूक व तोडणी मजुरांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल.महिलांना गर्भाशयाचे आजार,मणक्याचे आजार,पाय मोडणे,गाडीतून मोळी अंगावर पडणे हे सर्व प्रकार या मशीनमुळे कमी होतील व डोक्यावर मोळी घेऊन चालायचे श्रम देखील वाचेल त्याच बरोबर वेळ वाचून वायफट मनुष्यबळ देखील वाचणार आहे.

त्यामुळे मोठ्या वाहतूकदार व मुकादमांनी ग्रुप मध्ये ही मशीन खरेदी करून मजुरांच्या अती कष्टाला पूर्णविराम देऊ शकतो असे आमदार सुरेश धस यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.काळभोर कुटुंबातील सनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आ.सुरेश धस यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.यावेळी लोकनेते गोपीनाथरावजी साखर कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुखदेव अप्पा सानप,मुकादम भरत लवांडे,भुईंज कारखान्याचे लेबर कॉन्ट्रॅक्टर व मुकादम विकास सानप,सयाजी निकम,अनिल महारनोर,रामकृष्णनगर या गावचे सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.