उमरखेड येथे विपश्यना ध्यान साधना केंद्र सुरू

56
✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.12जुलै):-रविवार ला नियोजित विपश्यना ध्यान साधना केंद्र सुरू करण्यात आले.श्रीनिवास गॅस गोदामच्या पाठीमागे ढाणकी रोड, उमरखेड येथे सामूहिक ध्यान साधनेचे आयोजन करण्यात आले होते.साधने करिता नागपुर वरून उपासक डोंगरे गुरुजी (केंद्रीय आचार्य धम्ममल्ल विपश्यना केंद्र यवतमाळ ) उपासक गडलिंग गुरुजी (सहाय्यक आचार्य) उपासक लामसे गुरुजी उपस्थित झाले होते. मुळावा येथील आर्याजी सत्यरक्षिता उपस्थित होत्या.ध्यान साधने नंतर विपश्यना केंद्राविषयी चर्चा झाली.

ट्रस्टच्या सदस्यांनी विपश्यना केंद्र कशाप्रकारे लवकर उभे राहिल यावर आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाला परिसरातील अनेक साधक – साधिका आले होते. चर्चासत्रा नंतर सर्वांना चहा-नाश्ता देण्यात आला. उपासक डोंगरे सर व त्यांचे सहकारी यांनी विपश्यना केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी केली.
ट्रस्टचे अध्यक्ष उपासक गजानन शिंगणकर यांनी लवकरच या ठिकाणी साधने करिता टिनाचे शेड उभारणार असल्याचे सांगितले.दर रविवारला या ठिकाणी सर्वांना सकाळी 8 ते 9 सामुहिक साधनेला उपस्थित राहण्याचे सांगितले. यावेळीअनके बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव उपासक विजय कानिंदे यांनी केले तर आभार शर्पिना हिंगोले मॅडम यांनी केले.