जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हणेगाव ग्रामपंचायत येथे संगायो व श्रावणबाळ योजना कार्यक्रम

26

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.12जुलै):-मा.जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार व कोरोना संक्रमणामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील लोकांची दयनीय अवस्था पाहून अशा कुटुंबीयांना गरजेनुसार व पात्रतेच्या निकषानुसार शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ गोरगरीबांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने दि.०५ जुलै २०२१ ते २६ जुलै २०२१ पर्यंत योजना राबवित आहेत.

दि.११ जुलै २०२१ रोजी हणेगाव ग्रामपंचायत येथे जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार कोरोना महामारीमुळे संकटात असलेल्या सर्व गोरगरीबांच्या आर्थिक बाजूंचा विचार करून त्या भागातील गोरगरीब लोकांना ज्या योजनेचा लाभ मिळेल अशा योजनांचा फायदा करून देण्याचे आदेश त्या भागातील मंडळ अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक यांना देण्यात आले आहे,त्याच धर्तीवर गावात दवंडी देऊन संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना,६० ते ६५ वर्ष असणाऱ्या जेष्ठ नागरिक असे अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांना ग्रामपंचायत येथे बोलावून त्यांना योग्य मार्गदर्शन केले.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन हणेगाव येथील तलाठी श्री.कोंडलावार साहेब व हणेगाव ग्रा.पं.सदस्य विवेक पडकंठवार यांनी केले.या कार्यक्रमास उपस्थित श्री.कोंडलावार साहेब तलाठी सज्जा हणेगाव, मुजीबोदिन चमकुडे उपसरपंच,विवेक पडकंठवार ग्रा.पं.सदस्य,उमाकांत पंचगल्ले सदस्य,दिलीप बंदखडके सदस्य,वझीयोदीन चमकुडे सदस्य,संदिप चेलवे,किशोर आडेकर,भिमराव आडेकर,संतोष सर,मारोती बिरादार आदी जण उपस्थित होते.