मतदारसंघात आमदार मा. राजेश पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमी पूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

28

✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)मो:-९९६०७४८६८२

नायगांव(बाजार)दि.१३जुलै:-आमदार श्री राजेश संभाजीराव पवार साहेब यांच्या शुभहस्ते सावरखेड, आंतरगाव, मनुर, रुई खु पळसगाव व ताकबीड या सर्व गावांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा सी सी रोडचे भुमी पूजन व लोकार्पण सोहळा करण्यात आला.

या वेळी कार्यक्रमाला उपस्थित भाजपा जेष्ठ नेते व्यंकटराव पाटील सूगावे, बरबडा नगरीचे सरपंच बालाजी घोसलवाड, सरपंच वंजरवाडी श्री मुंडकर सर, सरपंच सावरखेड जयश्रीताई धोंडिबा इजगीरे, उपसरपंच सावरखेड नारायण पाटील ढगे ,उपसरपंच माधव कोलगाने, ग्रा पं सदस्य बरबडा कोंडेवाड, मनूर सरपंच नामदेव पाटील शिंदे ,उपसरपंच मारोतराव पाटील शिंदे,मारोतराव पाटील शिंदे मेळगाव,संजय पाटील शिंदे पळसगाव, दीपक पाटील कानोले, किशन पाटील कानोले,हणमंत पाटील शिंदे,कोंडीबा पाटील शिंदे ता अध्यक्ष भाजपा, शंकर पाटील कल्याण नायगाव शहर अध्यक्ष, सुनील पाटील शिंदे ,गुत्तेदार पांचाळ साहेब व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार साहेबांनी गावातील प्रत्येक रस्त्याची पाहणी केली व पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतकऱ्यांनचे पिक कर्जा संदर्भात, लाईट या सर्व विषयांच्या अडचणी एकूण चर्चा करण्यात आली व त्या सोडवण्यासाठी आश्वस्त केले.