चिमूर शिवसेना प्रभारी तालुका प्रमुखपदी श्रीहरी उर्फ बालू सातपुते यांची निवड

32

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.13जुलै):-चिमूर तालुकात दोन-तीन वर्षापासून रिक्त असलेल्या पदावर अखेर नियुक्ति करण्यात आली असून श्रीहरी उर्फ बालू सातपुते यांची शिवसेना चिमूर प्रभारी तालुका प्रमुख पदी नियुक्ति करण्यात आली आहे.शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चिमूर तालुकाचा आढावा घेत चंद्रपुर जिल्ह्या शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या सूचनेनुसार चंद्रपुर जिल्हा शिवसेना प्रमुख नीतिनजी मत्ते यानी चिमूर प्रभारी तालुका शिवसेना पदी युवा शिवसैनिक श्रीहरी उर्फ बालू सातपुते यांची निवड केली.

माजी शिवसेना संपर्क प्रमुख अजय स्वामी, माजी उपजिल्हा प्रमुख अजय वैरागड़े व माजी तालुका प्रमुख भाऊराव ठोंबरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विधार्थि अवस्थेत शिवसेना पक्षात प्रवेश घेतला. भारतीय विद्यार्थी सेना व युवा सेना मधे विविध पदे भूषवत शिवसेनाच्या माध्यमातून समाजकार्य करीत आहेत. सामाजिक क्षेत्रासोबत पत्रकारिता क्षेत्रात सुध्दा त्यांचे कार्य सुरु आहे, त्यांच्या सर्व कार्याची दखल घेत शिवसेना जिल्ह्या प्रमुख नीतिन मत्ते यांनी श्रीहरी सातपुते यांची पक्ष निष्ठा बघून संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यदी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कड़े शिफारस करीत त्यांची संजय ग़ांधी निराधार योजनेच्या सद्स्यपदी निवड केली. चिमूर तालुक्यात वाढलेल्या गटबाजी मुळे चिमूर तालुकातील पदाधिकारी नियुक्त्या रखडल्या होत्या, अखेर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे व युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हाप्रमुख श्री नीतिनजी मत्ते यांनी श्रीहरी उर्फ बालू सातपुते यांची चिमूर प्रभारी तालुका शिवसेना प्रमुख पदी नियुक्ति केली, यावेळी उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, नागभीड़ तालुका प्रमुख भोजराज ज्ञानभोर उपस्थित होते.

त्यांचा नियुवती बद्दल माजी उपजिल्हा प्रमुख धरमसिंग वर्मा, अनिल डगवार, सुधाकर निवटे, नत्थुजी डुकसे तसेच बंडू पारखी, किशोर उकुंडे, अरुण पिसे, केवलसिंग जूनी, कवडू खेड़कर, सुरेश गजभे, विनायक मुंगले, संतोश कामडी,अनिल रेवतकर, उदयभान राउत, अरुण गाडगे, दत्तू देवहारे, रोशन जुमड़े, अन्ना गिरी, संतोश जुमड़े, आशु बागुलकर यानी अभिनंदन केले.