हदगांव येथे दिव्यांगाला एस.टी.बस स्मार्ट कार्डाचे वाटप

25

🔸दिव्यांग विकास संघर्ष समितीच्या मागणीला यश

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.13जुलै):-महाराष्ट्र राज्यात सर्व प्रथम हदगांव तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला स्मार्ट कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तीला महाराष्ट्र राज्यात एस.टी बस प्रवासात दिव्यांग व्यक्तीला 75 टक्के बस प्रवास भाडे सवलत दिली जाते. व तसेच दिव्यांग व्यक्ती जर 65 टक्केच्या वर अपंगत्व असेल तर त्या दिव्यांगाला 75 टक्के बस प्रवास सवलत व त्यांच्या सोबतच्या (मदतनिस) व्यक्तीस 50 टक्के बस प्रवास सवलत दिली जाईल. व तसेच येणाऱ्या काही काळात हे एस.टी.बस प्रवास स्मार्ट कार्ड संपुर्ण महाराष्ट्रात लागु करण्यात येणार आहे. तरी सर्व दिव्यांग व्यक्तीने आपल्या तालुक्यातील एस.टी.बस आगारात आपले संगणकिय आॅन लाईन दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, आपला मोबाईल नंबर ( ओ.टि.पी.) करीता सोबत घेऊन स्मार्ट कार्ड नोंदणी 50 रुपये फिस आकारुन एस.टी बस प्रवास सवलत कार्ड काढून घ्यावे. असे आवाहन दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी केले आहे.

व तसेच एस.टी. बस स्मार्ट कार्डात काही संगणकीय तांत्रिक कारणांमुळे महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग व्यक्तीला बस प्रवास स्मार्ट कार्डाची नोंदणी होत नसल्याने दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी एस.टी बसच्या मुख्य व्यवस्थापक शेखर चन्ने मुंबई यांच्याशी संपर्क साधून संगणकीय प्रणालीतील दिव्यांग सवलती मधिल तांत्रिक अडचण बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यांची गार्भियांने दखल घेतल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांगाचे संगणकिय स्मार्ट कार्ड नोंदणीस सुरुवात झाली. व तसेच हदगांव येथे दिव्यांगाला एस.टी.बस प्रवास स्मार्ट कार्डाचे वाटप करण्यात आले.त्यावेळी जमीर पटेल, संजय व्यव्हारे, महेश चव्हाण एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी अधिकारी एम.डी. चव्हाण यावेळी उपस्थित होते.