महागाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने आंदोलन

19

🔹पदोन्नतीतील आरक्षणाच्या समर्थनात प्रतिनिधीत्व बचावो,लोकतंत्र बचावो आंदोलन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13जुलै):-राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन व त्यांच्या सर्व सहयोगी सामाजिक संघटनांच्या वतीने बहुजनांच्या संविधानिक प्रतिनिधित्व (आरक्षण ) नाकारल्याच्या विरोधात तसेच संविधानिक हक्क अधिकार संपवणाऱ्या धोरणाच्या व शासन आदेशाच्या विरोधात तसेच शेतकरी विरोधी कायदे,कामगार विरोधी कायदे,विद्यार्थी विरोधी शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण, कंत्राटी पद्धती,शिक्षण सेवक,सी एच बी,अंगणवाडी सेविका, डीसीपीएस पेन्शन योजना, रोस्टर अंमलबजावणी, इत्यादी सर्व 14 मुद्द्यावर महाराष्ट्र शासनाच्या बहुजन विरोधी धोरणांच्या विरोधात काल 12 जुलै रोजी महाराष्ट्रातील 36 जिल्हे 358 तालुक्यात एकाच दिवशी तहसिल कार्यालयासमोर धरणे व घंटानाद आंदोलन करण्यात आले.

26 जून ते 26 जुलै पर्यंत प्रतिनिधित्व (आरक्षण) बचावो लोकतंत्र बचवो अभियान आंदोलन चालणार आहे.18 फेब्रुवारी,20 एप्रिल व 7 मे 2021 रोजी काढलेला शासन निर्णय हा बहुजन विरोधी, संविधान विरोधी तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमानना करणारा आहे.पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेली सर्व शंभर टक्के पदे खुल्या प्रवर्गातून व सेवा जेष्ठते नुसार भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे .तो निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान करणारा आहे. तसेच या निर्णयाने SC,ST,OBC VJ,NT,DNT मराठा या बहुजनांचे संविधानिक अधिकार नाकारून त्यांच्यावर सुद्धा अपमान व अवहेलना आणि मानहानी शासन या कृतीतून करीत आहे.शासनाने सदरील आदेश दुरुस्त करून 33 टक्के पदोन्नतीतील आरक्षण मुद्द्यावर सर्व बिंदू समाविष्ट करावे. त्याचप्रमाणे एससी एसटी ओबीसी यांची पदोन्नतीची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करावी.
सरकारच्या या सर्व बहुजन विरोधी धोरणामुळे बहुजनांचे संविधानिक प्रतिनिधित्व (आरक्षण ) व मूलभूत हक्क अधिकार संपविले जात आहेत. या सर्व बहुजन समाज बांधवांच्या विरोधातील धोरणाच्या आणि शासन आदेशाच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व्दारा आंदोलनाचे दुसरे चरण 12 जुलै-2021 ला तहसील कार्यालयासमोर धरणे व घंटानाद आंदोलन महागाव तहसिल कार्यालयासमोर संपन्न झाले.नंतर मा.तहसिलदार साहेबामार्फत माननिय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.यावेळी RMBKS शाखा महागावचे अविनाश शेंडे, राजकुमार थोरात, दशरथ मुरमुरे, दत्ता माहुरे, किशोर नगारे, रमेश नलावडे, संतोष ढगे, रमेश कांबळे, संजय बनसोडे, धम्मसंदेश कांबळे, राम जाधव उपस्थित होते.*