रखडलेल्या पोलिस भर्तीला मिळाला अखेर मुहूर्त – बारा हजार पोलिसांची होणार राज्यात मेगाभर्ती

22

✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)

नांदेड(दि.13जुलै):-मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून राज्यात १२ हजार पोलिसांची मेगाभरती होणार असून त्यापैकी ५२०० जणांची भरती डिसेंबर अखेरपर्यंत होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

जिह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थितीत होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलीस दलात भरती झालेल्या कर्मचाऱयांना दर दहा वर्षांनंतर बढती दिली जाते. सहायक फौजदार झाल्यानंतर तो कर्मचारी सेवानिवृत्त होतो.मात्र निवृत्त होताना पोलिसांमधील सहायक फौजदार पदावरील कर्मचाऱयांचे वेतन हे उपनिरीक्षक पदाच्या अधिकाऱयांएवढे आहे. पिंबहुना अनेक हवालदारांचे वेतन उपनिरीक्षकांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे त्यांना निवृत्तीपर्यंत उपनिरीक्षकपदापर्यंत बढती देण्याचा विचार गृह विभागाने घेतल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

राज्यातील पोलीस दलात १२ हजार पदांसाठी मेगाभरती होणार आहे. त्यापैकी ५२०० पदे डिसेंबर अखेरपर्यंत भरण्यात येणार आहेत. उर्वरित सात हजार पदे पुढील टप्प्यात भरण्यात येणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.