डिजीटल मिडिया संपादक,पत्रकार संघ बीड जिल्हा कार्यकारीणी जाहिर

26

🔸जिल्हा उपाध्यक्षपदी बबलु वजीर सय्यद तर जिल्हा सहचिटणीसपदी मनोज सातपुते यांची निवड

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.13जुलै):-महाराष्ट्रातील जेष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या डिजीटल मिडिया संपादक,पत्रकार संघाची बीड जिल्हा कार्यकारीणी जाहिर करण्यात आली आहे.बीड शहर अध्यक्षासह चार उपाध्यक्ष,जिल्हा चिटणीस आदिंचा यामध्ये समावेश आहे.डिजीटल मिडिया संपादक,पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष संतोष मानूरकर यांनी १२ जुलै रोजी कार्यकारीणी जाहिर केली.बीड जिल्हा उपाध्यक्षपदी बबलु वजीर सय्यद,अमोल वैद्य,गोवर्धन बडे,रोहित दिक्षीत यांची निवड करण्यात आली.

जिल्हा चिटणीसपदी सिराज आरजू यांची तर जिल्हा संघटक पदी जालिंदर धांडे यांची निवड केली.सहचिटणीसपदी मनोज सातपुते आणि कोषाध्यक्षपदी हरिदास तावरे यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली.त्याच प्रमाणे बीड शहराची स्वतंत्र कार्यकारीणी करण्यात आली असून शहर अध्यक्षपदी अजय शेरकर आणि शहर सचिवपदी अमोल पटवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा व शहर कार्यकारीणीचा विस्तार आणि तालूका कार्यकारीणी लवकरच जाहिर करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष मानुरकर यांनी सांगितले.