बदनापूर अंबड विधानसभा मतदार संघातील गेवराई बाजार,सोमठाणा, बदनापूर अकोला,रमदुलवाडी, शेलगाव, आणि करमाड येथे रेल्वे मार्गावर उड्डाण पूल अथवा भुयारी मार्गास करण्यात यावे

22

🔸अंबड बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांची मागणी

🔹रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन दिले मागण्या चे निवेदन

✒️अतुल उनवणे(विशेष प्रतिनिधी)

बदनापूर(दि.13जुलै):- अंबड विधानसभा मतदार संघातील गेवराई बाजार,सोमठाणा, बदनापूर अकोला,रमदुलवाडी, शेलगाव, आणि करमाड येथे रेल्वे मार्गावर उड्डाण पूल अथवा भुयारी मार्गास करण्यात यावेत यासाठी रेल्वे मंत्रालयांतर्गत कामास मंजुरी देण्यात यावी यासाठी आज दिल्ली येथे अंबड बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी रेल्वे,कोळसा खान,केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांची भेट घेऊन पत्राद्वारे विनंती व मागणी केली आहे.
भेटीदरम्यान निवेदन देऊन वरील मागणी केली तसेच मतदार संघातील इतरही विकासात्मकदृष्टया मुद्यावर चर्चा केली.भेटीदरम्यान रेल्वे राज्यमंत्री महोदयांनी रेल्वे उड्डाण पूल अथवा भुयारी मार्गासंदर्भात तांत्रिक बाबी तपासून कामास मंजुरी देण्याबाबत सकारात्मका दर्शवली.